घरमुंबईओशिवरा येथे मांजरीला जिवंत जाळलं

ओशिवरा येथे मांजरीला जिवंत जाळलं

Subscribe

ओशिवरा येथे जिवंत मांजरीला जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात विकृताचा शोध घेत आहेत.

बऱ्याच व्यक्तींना प्राण्यांविषयी विशेष प्रेम असते. अनेक व्यक्ती पाळीव प्राण्यांना जिव लावून त्यांना जिवापाड जपतात. मात्र भटक्या प्राण्यांना कोणीही वाली नसतो हे मात्र तितकच खरं. अनेकदा या भटक्या प्राण्यांना मारहाण देखील केली जाते. मात्र याहूनही भयंकर प्रकार मुंबईतील ओशिवरा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळून क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक प्राणीप्रेमींनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मांजरीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तपास करुन अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

नेमके काय घडले?

ओशिवरा येथील गावदेवी इमारतीच्या मागील बाजूस मृतावस्थेत मांजर आढळून आली. या मांजरीला उपाशी ठेवण्यात आलं होत. तसेच तिला बांधून त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं, असं सांगण्यात येत आहे. तसेट ज्या ठिकाणी मांजरीला जाळण्यात आलं त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. त्यामुळे या घटनेचा छडा लावण्यात अडचणी निर्माण होत आहे. तसेच या मांजरीचे शल परळ येथील रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असल्याची माहिती ‘बेजुबान पब्लिक वेलफेअर ट्रस्ट’च्या हेमा चौधरी यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

स्थानिकांकडून भटक्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात छळ केला जात आहे. तसेच प्राण्यांना निर्दयीपणे मारहाण देखील केली जाते. तर अनेक भटक्या प्राण्यांना मारहाण करुन त्यांना जायबंदी करुन सोडून देण्यात येत असल्याचे प्रकारही घडतात.  – संजीव चोप्रा, प्राणी प्रेमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -