घरमुंबईपीटीएचा विरोध डावलून ;यूईएस शाळेची नव्या गणवेशासाठी सक्ती

पीटीएचा विरोध डावलून ;यूईएस शाळेची नव्या गणवेशासाठी सक्ती

Subscribe

उरण येथील उरण एज्युकेशन सोसायटी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांवर नव्या गणवेशाची सक्ती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या गणवेश बदलाला शाळेच्या शिक्षक-पालक संघटनेने विरोध केला होता. हा विरोध डावलून गणवेशाची सक्ती करण्यात येत असल्याने शुक्रवारी पालकांनी शाळेच्या प्रिन्सिपल सिमरन यांना जाब विचारला.

उरण येथील उरण एज्युकेशन सोसायटी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने विद्यार्थ्यांवर नव्या गणवेशाची सक्ती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या गणवेश बदलाला शाळेच्या शिक्षक-पालक संघटनेने विरोध केला होता. हा विरोध डावलून गणवेशाची सक्ती करण्यात येत असल्याने शुक्रवारी पालकांनी शाळेच्या प्रिन्सिपल सिमरन यांना जाब विचारला. येत्या १८ तारखेला होणार्‍या पालकांच्या सर्वसाधारण सभेत निर्णय झाल्याशिवाय कोणतीही सक्ती करू नका, असा सज्जड इशारा पालकांनी दिल्यावर सक्ती थांबविण्याचा शब्द प्रिन्सिपलना द्यावा लागला.

उरण एज्युकेशन सोसायटी या शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश बदलण्याचा घाट शाळेच्या व्यवस्थापनाने गेल्या वर्षापासून घातला आहे. हा विषय गेल्यावर्षी पीटीएपुढे आला तेव्हा पालक प्रतिनिधींनी गणवेश बदलाला जोरदार विरोध दर्शवला. मात्र विद्यार्थिनींच्या गणवेशाचा पॅटर्न बदलण्यास पीटीएने मान्यता दिली होती. त्यानुसार विद्यार्थिनींना स्कर्ट ऐवजी पलाजू स्कर्ट वापरण्यास संमती देण्यात आली होती. याचा अंमल करताना संस्थेने विद्यार्थ्यांचाही गणवेश बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे. पीटीएच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांवर एक रुपयाचीही आकारणी करता येणार नाही, असे शासनाने निश्चित केले असताना या शाळेने विद्यार्थ्यांवर २६०० रुपयांच्या गणवेशाची सक्ती केल्याने पालक बिथरले आहेत.

- Advertisement -

गेले तीन दिवस शाळेच्या शिक्षिकांनी हे गणवेश विद्यार्थ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रयत्न केल्याने बिथरलेल्या पालकांनी एकत्र जमून प्रिन्सिपल सिमरन यांना जाब विचारला. पीटीएचे उपाध्यक्ष जयवंत सतेरे, संदीप पानसरे, निलेश कदम, नेहा हनीमकर, अमित नार्वेकर, दिपक पिल्ले, समीर म्हात्रे या पीटीए सदस्यांनी व्यवस्थापनाच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला. तर दर्शना ठाकूर, जान्हवी पडते, मेघना पाटील, भवेशा कपाडिया आणि अर्चना पटेल या सदस्यांनी ही बळजबरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. सामान्य पालकांवर ही गणवेश सक्ती तात्काळ मागे घ्या, अशी मागणी दत्तात्रेय शेळके आणि मंगेश घरत या पालकांनी केली. तर काही पालकांनी ९०० रुपयांच्या गणवेशासाठी २६०० रुपयांची आकारणी हा पालकांची लूट करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. अखेर पालकांच्या येत्या १८ तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याची पालकांची मागणी प्रिन्सिपल सिमरन यांनी मान्य केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -