घरमुंबई'एक स्री दुसऱ्या स्रीला दोषी कसं म्हणू शकते', उर्मिलाची महिला आयोग सदस्यावर...

‘एक स्री दुसऱ्या स्रीला दोषी कसं म्हणू शकते’, उर्मिलाची महिला आयोग सदस्यावर टिका

Subscribe

एक स्री दुसऱ्या स्रीला दोषी कसं म्हणू शकते. हे अत्यंत निराशाजनक आणि दुर्देवी आहे', असे उर्मिला यांवी ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार करून महिलेची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर राष्ट्रिय महिला आयोगाने आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पिडीत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पत्र पाठवले होते. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले. ‘ संध्याकाळच्या वेळी त्या महिलेने एकट्याने घराबाहेर पडायला नको होते. तिच्या सोबत कोणी घरातील व्यक्ती किंवा मुल असते तर ही घटना घडली नसती’, असे विधान त्यांनी केले. या विधानामुळे शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनीही चंद्रमुखी देवी यांच्या वादग्रस्त विधानावर टिका केली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री तसेच शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत एक ट्विट केले आहे. ‘ही मानसिकताच मुळात आतमधून बदलण्याची गरज आहे. तोपर्यंत कोणाताही बदल होण्याची शक्यता नाही. एक स्री दुसऱ्या स्रीला दोषी कसं म्हणू शकते. हे अत्यंत निराशाजनक आणि दुर्देवी आहे’, असे उर्मिला यांवी ट्विटमध्ये म्हटले आहे. उर्मिलाच्या या ट्विटवर अभिनेत्री तापसी पन्नू आणि पुजा भट्ट हिनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर देशात या मानसिकतेची लोकं राहत नसती तर अशी घटना घडली नसती’, असे अभिनेत्री तापसी पन्नू हिने म्हटले आहे. ‘तर तुम्ही ही त्यांच्या बोलण्याशी सहमत आहात का?’, असे ट्विट करत पुजा भट्ट प्रश्न उपस्थित केला आहे.

उत्तर प्रेदशमधील बदायूंमध्ये ३ जानेवारीला एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शंनाला गेलेली महिला घरी परत आलीच नाही.मंदिराती एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणला, असे महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले. सामुहिक बलात्कार करून महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये महिलेच्या गुप्तांगावर अनेक जखमा आठळून आल्या. नराधमांनी अत्याचार करताना त्या महिलेचा पायही मोडला होती. या प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेचा तपास करून संबंधित आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘संध्याकाळी बाहेर पडली नसती, तर वाचली असती’, महिला आयोग सदस्याचं वक्तव्य!

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -