Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई उर्मिलाने ‘सीएम फंडा’ला दिले काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख

उर्मिलाने ‘सीएम फंडा’ला दिले काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख

काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांना ५० लाख रुपये देण्यात आले होते.

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसच्या निवडणुक निधी खात्यातून २० लाख रुपये परस्पर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी ५० लाख देण्यात आले होते त्यातील ३० लाख निवडणुकीचा खर्च झाला तर उरलेले २० लाख रुपये जुलै 2020 ला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला आहे. परंतु या पैशावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर ऊर्मिला मातोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सीएम रिलीफ फंडाला दिलेल्या मदतीवरून काही कुख्यात लोक कथा रचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीनेच हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले. करोनाच्या काळात लोकांच्या कल्याणासाठीच मी या पैशाचा वापर केला,” असं ऊर्मिला यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक खर्चासाठी कांदिवलीतील सरकारी बँकेत खातं उघडलं होतं. महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव अशोक सुत्राळे हे या संयुक्त खात्याचे खातेधारक होते. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाचं बंधन घातलेलं असून, उमेदवाराला ७० लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसनं एप्रिल २०१९ मध्ये ऊर्मिला यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुरू केलेल्या संयुक्त खात्यात ५० लाख रुपये जमा केले होते.

- Advertisement -

या खात्यातून निवडणुकीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तर २० लाख रुपये जुलै २०२० पर्यंत खात्यात शिल्लक होते. ऊर्मिला मातोंडकर यांनी या खात्यातील २० लाख रुपये जुलैमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ही मदत देण्यात आली. त्यामुळे याची चर्चा सुरू झाली. वर्षभरापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दित नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, २०१९ लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. त्यांनी उत्तर मुंबईतून भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली.

- Advertisement -