लोकसभा २०१९ : भाजपच्या गोपाळ शेट्टीविरोधात काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर मैदानात

Mumbai
urmila matondkar contest election against of Gopal shetty

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने उत्तर मंबई मतदारसंघातून उर्मिलाला उमेदवारी दिली आहे. याबाबतची काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला मातोंडकर टक्कर देणार आहे. उर्मिला मातोंडकरने दोन दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे संजय निरुपम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसतर्फे नव्या उमेदवाराचा शोध सुरु होता. उर्मिला मातोंडकरच्या रुपाने काँग्रेसला हा उमेदवार गवसला आहे. काँग्रेसने बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. हा बालेकिल्ला भेदण्यात उर्मिला यशस्वी होणार का? हे आता येणाऱ्या काळात कळेल.