घरमुंबईउर्मिला मातोंडकर खासदार बनणार?

उर्मिला मातोंडकर खासदार बनणार?

Subscribe

उत्तर मुंबई हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून याठिकाणी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा विजय पक्का मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा कोणीही उमेदवार याठिकाणी निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार नसतानाही उर्मिला मातोंडकर या शेट्टींना टक्कर देण्यास तयार झाल्या आहेत. मातोंडकर यांच्या उमेदवारीने या भागातील काँग्रेसमध्ये तसेच जनतेमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मातोंडकर या शेट्टींना काँटे की टक्कर देणार हे निश्चित आहेत. त्यामुळे यामध्ये साडेपाच लाखांचे मताधिक्य कमी करून त्यांनी विजय मिळवून जाईंट किलर बनल्या तर कौतुक ठरेल. पण या लढाईची दखल घेत पक्षाच्यावतीने त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एनकेन प्रकारे उर्मिला मातोंडकर खासदार बनणार हे मात्र निश्चित.

मागील निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टींनी पावणे पाच लाखांचे मताधिक्य घेवून आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांना व्हाईट वॉश दिला होता. असे असतानाही सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शेट्टींविरोधात रणांगणात उतरल्या. एक सेलिब्रेटी म्हणून त्यांची ओळख असली तरी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांनी राजकारणात एन्ट्ी करत राजकीय धुरीणांना तोंडात बोटे लावायला लावली. उर्मिलाच्या या एन्ट्रीने शेट्टी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. या मतदार संघात उर्मिला मातोंडकर यांना सहजासहजी विजय मिळवणे फारच कठीण गोष्ट आहे. विजयाच्या आसपासही भाजप त्यांना फिरकू देणार नाही,असे बोलले जाते.

- Advertisement -

त्यामुळे मागील निवडणुकीतील साडेपाच लाखांचे मताधिक्य उर्मिला किती कमी करतील आणि कसा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करतील याकडेच सर्वांचे लक्ष आहे. उर्मिलाच्या रुपाने उत्तर मुंबईतील सर्व धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना एक पर्याय उपलब्ध निर्माण झाल्याने दोघांमध्ये एकतर्फी नव्हे तर काँटे की टक्कर होईल,असे बोलले जात आहे. उर्मिलाला पराभव पत्कारावा लागला तरी त्यांना निराश पक्ष निराश होवू देणार नाही.

वांद्रे पूर्व विधानसभा फॉर्म्युला

- Advertisement -

उर्मिला मातोंडकर यांनी आपण केवळ निवडणुकीपुरतेच काँग्रेस पक्षात नाही तर त्यानंतरही आपण पक्षासोबत राहू असे पहिल्याच सभेत सांगितले. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. वांद्रे पश्चिम येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला विजय मिळवणे शक्यच नव्हते. डोक्यासमोर पराभव असल्याने कोणीही उमेदवार तयारी दर्शवत नव्हता. अशावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तयारी दर्शवली व निवडणूक लढवली.

पण या बदल्यात तेव्हा त्यांना विधानपरिषद सदस्यत्व देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याप्रमाणेच उत्तर मुंबईतील उमेदवार यांचा पराभव झाल्यास त्यांना राज्य सभेवर पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उर्मिला मातोंडकर यांना निवडून देत लोकसभेत पाठवून विकास कामे करून घ्यायची की राज्यसभेवर त्यांना पाठवण्याची व्यवस्था करायची हे आता उत्तर मुंबईतील मतदारांना निश्चित करायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -