घरमुंबईपाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर

पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर

Subscribe

कल्याण डोंबिवलीतील पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 14 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियन टीम केडीएमसीला भेट देणार आहेत. दुषित पाणी, पाण्याची गुणवत्ता आणि यामुळे पसरणारे साथीचे आजार, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा अशा अनेक तक्रारीवर यामुळे तोडगा निघणार आहे. अशी माहिती केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती सभेत दिली.

महापालिकेत प्रतिदिन सरासरी 250 दशलक्षलिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा कुचकामी ठरल्यानेच आजही अनेक परिसरांत पाणीटंचाई व दूषित पाण्याची समस्या कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या ऑस्ट्रेलियन कंपनीला येत्या 14 फेब्रुवारी रोजी केडीएमसी मध्ये पाचारण केले आहे. या कंपनीने केलेल्या प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून या विषयासंदर्भात माहिती देणार आहे. या विषयीची माहिती कंपनीचे संचालक टोनी हिगसन हे देणार आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून केडीएमसी प्रशासनाला ऑनलाईन नागरिकांच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करता येणे शक्य होणार आहे. यामध्ये पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा कमी-जास्त दाबाने होणारा पुरवठा तसेच दूषित पाणी पुरवठा कुठे होत आहे. हे समजण्यासाठी प्रत्येक पाण्याच्या टाकीच्या शेवटी वायरलेस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. आणि 12 तासांच्या आत समस्येचे निराकरण होणार आहे.

- Advertisement -

पाण्यातील भौतिक, रासायनिक वजैविक घटकांची असलेली मात्रा म्हणजेच पाण्याची गुणवत्ता होय. कल्याण डोंबिवली शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पालिकेच्या अन्य सेवांबरोबरच पाणीपुरवठा यंत्रणेवरही त्याचा ताण पडत आहे. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाण्यात जास्तीत जास्त घटक सामावून, विरघळवून घेण्याची क्षमता असते. भारतीय मानक संस्थेने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार ही तपासणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -