डोंबिवली ते मुंबई प्रवासाची गर्दी कमी करण्यासाठी स्कूल बस वापरा

Use school bus to ease the crowd of dombivli to mumbai journey

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हटवण्यात आला. मात्र, मुंबईतील वाहतुक सेवा पूर्वी प्रमाणे सुरु न केल्याने सोशल डिस्टंसिंगचे दररोज तीन तेरा वाजत आहेत. राज्य सरकारने कम्युनिटी स्प्रेड वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी उपाय करायला हवे आहेत. मात्र, याच्या उलट सगळं दिसत आहे. डोंबिवली ते मुंबई प्रवास करताना नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बसमधून प्रवास करताना सोशल डिस्टंसिंग पाळली जात नाही आहे आणि हे खूप धोकादायक आहे. डोंबिवली ते मुंबई प्रवासात ७ तास लागत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. बसमध्ये गर्दी वाढू नये यासाठी अधिक वाहने विशिष्ट वेळाने सोडण्यात यावी, त्यासाठी गरज पडल्यास स्कूल बसचा वापर करा, असं आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली. केंद्र सरकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू केलेली नाही. पण रस्ते वाहतुकीला प्राधान्य दिलेलं आहे. असं असतानाही ठाणे जिल्ह्यात मात्र डोंबिवली ते मुंबई प्रवासाला ७ तास लागत आहेत ही बाब गंभीर असल्याचं विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं. शिवाय बसमधली गर्दी कमी करण्यासाठी स्कूल बसचा वापर करावा, असा सल्ला देखील दिला आहे.

डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात सकाळी बस पकडण्यासाठी नोकरदारांचे ३ किमी पर्यंत रांगा लागत आहेत ही खरी परिस्थिती मनपा, सत्ताधारी का लपवत आहेत. सातत्याने त्या गर्दीबद्दल आवाज उठवला जात आहे? ही गर्दी कमी करण्यासाठी पूर्वेला बस उभ्या करण्यासाठी ६ ठिकाणं असावीत, याची माहिती आयुक्तांना, पालकममंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. पश्चिमेला देखील बस सोडाव्यात असंही सांगितले होते, परंतु त्याचं पालन केलं गेलं नाही ही वस्तुस्थिती असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलणार – संरक्षणमंत्री