घरमुंबईऑनलाईन दारु मागवताय मग सावधान...

ऑनलाईन दारु मागवताय मग सावधान…

Subscribe

महाराष्ट्र वाइन मर्चेंट्स असोसिएशनकडे १२ पेक्षा अधिक दारुच्या दुकान मालकांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये ५ दारु दुकान मालकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

जर तुम्ही ऑनलाईन दारु किंवा बिअर खरेदी करत असाल तर थोडे सावध रहा. कारण दारु खरेदी करत असताना तुमची फसवणुक होऊ शकते. ऑनलाईन खरेदी करताना भामटे तुम्हाला लक्ष्य करु शकतात. भामट्यांचा आजकाल सुळसुळाट वाढला आहे. या भामट्यांनी आता ग्राहकांना फसवण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. यामध्ये हे भामटे ऑनलाईन असलेल्या दारुच्या दुकानांच्या वितरणामध्ये आपला नंबर पोस्ट करतात. त्यामुळे ग्राहका दारुची ऑर्डर त्यांच्याकडे करतात. फोन आल्यानंतर ते ई -वॉलेटच्या माध्यमातून पैसे देण्याचे ग्राहकांना सांगतात. पैसे दिल्यानंतर जर दारुची ऑर्डर घरी पोहचत नाही तर ग्राहकांना आपली फसवणुक झाल्याचे समजते.

अनेक तक्रार दाखल

देशातील शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढू लागले आहे. आता दारुची खरेदी देखील आपण ऑनलाईन करु शकतो. मात्र अनेकदा ग्राहकांची फसवणुक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जवळपास ६ पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महाराष्ट्र वाइन मर्चेंट्स असोसिएशनकडे १२ पेक्षा अधिक दारुच्या दुकान मालकांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या वांद्रे, सांताक्रुझ, घाटकोपर आणि चेंबूर याठिकाणच्या पोलीस ठाण्यात अशा तक्रारी दाखल आहेत.

- Advertisement -

हे करणे आवश्यक

याप्रकरणाचा तपास करण्याऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, असे बरेच अॅप्स आहेत जे यूजर्स सर्च इंजिनवर त्यांच्या व्यवसाय सूचीतील माहितीमध्ये बदल करण्याचा अधिकार देतात. साधारणपणे, सर्च इंजनवर दुकान मालक अथवा प्रबंधकाकडून जर प्रत्येक वेळी कोणत्याही प्रकारचा बदल झाला तर सूचना पाठवणे गरजेचे आहे. मात्र जास्त करुन या प्रकरणात असे होत नाही. त्यात दुकान मालक, प्रबंधक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना याचा तपास करणे गरजेचे वाटत नाही. ऑनलाईन दारु खरेदी केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, त्यांनी आपल्या परिसरातील सगळ्यात चांगले दारुच्या दुकानाचा नंबर इंटरनेटवर पाहिला आणि १३०० रुपयेची दारु मागवली मात्र त्यांना ऑर्डर मिळाली नाही. ज्यावेळी त्यांना फसवणुक झाल्याचे कळाले तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

प्रतिमा खराब होतेय  

या प्रकरणी दारुच्या दुकान मालकांनी असे सांगितले की, यामुळे आमची प्रतिमा खराब होत आहे त्याचसोबत व्यवहारावर देखील परिणाम होत आहे. महाराष्ट्र वाइन मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ज्ञनानी यांनी सांगितले की, त्यांनी सर्व दुकानदारांना सांगितले आहे की, ते इंटरनेटवर आपल्या दुकानाचे वितरण पाहत रहावे. गेल्या तीन महिन्यामध्ये ५ दारु दुकान मालकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -