घरमुंबईवैभव राऊत सनातचा नाही; सनातनच्या वकीलांचा खुलासा

वैभव राऊत सनातचा नाही; सनातनच्या वकीलांचा खुलासा

Subscribe

नालासोपारा येथे एटीएसने केलेल्या कारवाईत वैभव राऊत याच्या घरातून आठ देशी बॉम्ब हस्तगत केले. हा सनासनचा साधक असल्याचे म्हटले जात असतानाच सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभल हा सनातनचा सदस्य नाही, असा खुलासा केला आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातचना साधक नाही. तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. वैभवने असं काही केलं असावं, असं वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत वकील म्हणून करु. हे सांगताना सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगितले. तसेच गृहमंत्री जाणून बुजून हे घडवत आहेत, असा संशय येत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला. सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत, असंही ते म्हणाले आहे.

 

- Advertisement -

१९९३ नंतर पहिल्यांदाच प्रचंड आरडीएक्स सापडले 

१९९३ नंतर पहिल्यादाच आरडीएक्स हे मुंबईत सापडले आहे. हे आरडीएक्स प्रचंड क्षमतेचे विस्फोटक असल्याचं मानलं जातं. लोकल भाषेत याला काला साबून, असं म्हणतात. हे आरडीएक्स कसं नालासोपारापर्यंत पोचलं याचा एटीएस तपास घेत आहेत.

- Advertisement -

नालासोपाऱ्यात आठ देशी बॉम्ब हस्तगत

नालासोपारा येथे गुरुवारी मध्यरात्री एटीएसने कारवाई करत एकाच्या घरातून आठ देशी बॉम्ब हस्तगत केले. नालासोपारामधील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने रात्री छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून आणि दुकानातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -