घरमुंबईउद्दव ठाकरे आणि फडणवीसांचा केवढा तो एकमेकांवर जीवः मुंडे

उद्दव ठाकरे आणि फडणवीसांचा केवढा तो एकमेकांवर जीवः मुंडे

Subscribe

राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बेस्ट कपल असल्याच ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी या दोनही नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

राजकारणातील बेस्ट कपल म्हणजेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असे ट्वीट विधनपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे . या दोनही नेत्यांची व्हेलेनटाईनसडे च्या दिवशी मस्करी करत त्यांनी ट्वीटरवरून दोघांचा एकत्र फोटो देखील टाकला आहे.

नेमक काय आहे ट्वीट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हेलेनटाईनसडेच्या निमित्ताने उद्दव ठाकरे आणि फडणवीस यांच्या युतीवर भाष्यकरणार एक ट्वीट केल आहे. “यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का ? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच…केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का ? अस ट्वीट करत तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती असलेल्या भाजप आणि सेनेला टोला लगावला आहे.

- Advertisement -

एकत्र फोटा ही केला शेअर

या ट्वीट सोबतच त्यांनी एक फोटा देखील शेअर केला आहे. या फोटो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्वव ठाकरे हसत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. आता पर्यंत सत्तेत सहभागी असून ही अनेक सभा आणि भाषणांमधून भाजपावर टिकाकरत विरोधकाचीच भुमिका सेनेने बजावली आहे. काही दिवसांवरच लोकसभा निवडणूक येऊन ठेपली असताना देखील युतीच घोंगड भिजतच ठेवल आहे. म्हणुनच केवढा तो एकमेकांवर जीव नाही का ? अस धनंजय मुंडेंनी केलेल ट्वीट योग्यच आहे असं म्हटलं तर वावगं नक्कीच ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -