घरमुंबईVarsha Raut ED Inquiry : 'ते' ५५ लाख वर्षा राऊतांनी परत केले!

Varsha Raut ED Inquiry : ‘ते’ ५५ लाख वर्षा राऊतांनी परत केले!

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ED चौकशी झाली होती. PMC Bank घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याकडून २०१०मध्ये ५५ लाख रुपयांचं कर्ज घेतल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. यासंदर्भात ४ जानेवारी रोजी ईडीची चौकशी झाल्यानंतर आता वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत केले असून त्यासंदर्भातली कागदपत्र त्यांनी ईडीच्या कार्यालयाला पाठवलेली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावर ईडीकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ED वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या मुद्द्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

वर्षा राऊत यांनी १० वर्षांपूर्वी घेतलेलं कर्ज अद्याप फेडलेलं नव्हतं. हे कर्ज त्यांनी घोटाळ्यात अडकलेल्या एका व्यक्तीकडून घेतलं असल्यामुळे त्यांच्या या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. हे कर्ज आपण फेडलं असल्याचं वर्षा राऊत यांच्याकडून सोमवारी ईडीला कळवण्यात आलं आहे. त्यासोबत कागदपत्र देखील जोडली आहेत. यामध्ये ‘ठाकरे’ सिनेमाच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामधून हे ५५ लाख रुपये चुकते केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. वर्षा राऊत ‘ठाकरे’ सिनेमाच्या सहनिर्मात्या होत्या. तर संजय राऊत यांनी हा सिनेमा लिहिला होता.

काय आहे PMC घोटाळा?

मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने HDIL चे राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. वाधवान बंधूंसोबतच या प्रकरणात PMC बँकेचे संचालक वर्यम सिंह आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांची देखील नावं आहेत. गैरव्यवहारातून या चौघांनी बँकेचं ४ हजार ३५५ कोटींचं नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत हे HDIL शी संबंधित गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे माजी संचालक आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज निधीमधून एचडीआयएलने प्रवीण राऊत यांच्या मदतीने ९५ कोटींची रक्कम वळती केल्याचा आरोप असून त्या प्रकरणी प्रवीण राऊत यांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -