घरमुंबईभर पावसात नायगावातील टँकरचे पाणी 200 रुपयांनी महागले

भर पावसात नायगावातील टँकरचे पाणी 200 रुपयांनी महागले

Subscribe

मुसळधार पाऊस पडत असतानाही वसई तालुक्यातील जुचंद्र परिसरातील टँकरचे पाणी मात्र,200 रुपयांनी महागले आहे.

मुसळधार पाऊस पडत असतानाही वसई तालुक्यातील जुचंद्र परिसरातील टँकरचे पाणी मात्र,200 रुपयांनी महागले आहे.
मुंबईला लोहमार्ग आणि महामार्गाने मुंबईला सर्वात जवळ असलेल्या नायगांव पूर्वेकडील जुचंद्र, परेरानगर,वाकीपाडा,चंद्रपाडा,बापाणे,चिंचोटी येथे ही पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुर्वीच्या पाच हजार नागरिकांसाठी ग्रामपंचायतीने पाझर तलावातून नळपाणी योजना सुरू केली होती. महापालिका अस्तित्वात आल्यानंतरही हीच योजना कायम राहिली.मात्र,त्यानंतर स्टार सिटी, पारसनाथ, सोमेश्वरनगर, हसोबानगर, म्हात्रेवाडी, रिलायबल, काजुपाडा, खोपरीपाडा परिसर विकसित झाले. या परिसरात हजारो चाळी आणि इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या पाण्याचा तात्पुरता प्रश्न विकासकांनी टँकरच्या माध्यमातून सोडवला. त्यामुळे नायगांव पूर्व आणि टँकरचे पाणी हे समीकरण सर्वांच्या अंगी पडले. पाच हजारांचे गांव दीड लाखांवर गेले.मूळ गावाला पाझर तलावाचे पाणी मिळत राहिले. नवीन वस्त्या टँकरने काबीज केल्या. त्यामुळे टँकरमागे 900 रुपये येथील नागरिकांना मोजावे लागत होते. पावसाळा सुरू झाल्यावर ही परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिकट झाली आहे. पावसाचे पाणी साठवण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे ते गटाराला जाऊन मिळते.

- Advertisement -

तसेच गल्लोगल्ली चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य पसरत जात असल्यामुळे अशा वस्त्यांमध्ये जाण्यासाठी टँकरचे भाव 200 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सोसायट्यांना,चाळींना 1100 रुपये मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या टँकरच्या दरांना आळा घालण्याचे अधिकार तहसिलदारांना आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशाने तहसिलदारांसह संयुक्त कारवाई करता येईल, असे या परिसरातील पालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले. तर या प्रकरणी कारवाईचे संकेत वसईचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी दिले आहेत.ठरवून दिलेल्या दरापेक्षा अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन कोणी नागरिकांचा गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -