घरCORONA UPDATECorona: वाशी APMC मार्केटची गर्दी टळेना; अखेर निर्णय झालाच!

Corona: वाशी APMC मार्केटची गर्दी टळेना; अखेर निर्णय झालाच!

Subscribe

वाशीमध्ये भरणाऱ्या एपीएमसीमधल्या भाजीमार्केटमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं दिसून आल्यानंतर अखेर हे भाजीमार्केट वाशीमधून खारघरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं. असं करताना मेडिकल, दवाखाने, भाजीपाला आणि किराणाची दुकानं, फळविक्री, अंडी-मासे-मटण-चिकन विक्री, पोलीस, सरकारी कर्मचारी यांना जीवनावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊनमधून वगळलं होतं. मात्र, यामुळे भाजीपाला आणि किराणाच्या दुकानांवर मोठी गर्दी होताना पाहायला मिळात आहे. मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला पुरवणाऱ्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये तर गाड्यांची आणि माणसांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अखेर सरकारने वाशी एपीएमसी मार्केटमधलं भाजी मार्केट हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा!

वाशी एपीएमसी मार्केट ३१ तारखेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय तिथल्या व्यापारी संघटनांनी आधी घेतला होता. मात्र, नंतर
लोकांची अडचण होऊ नये, म्हणून अन्नधान्य आणि भाजीपाला यांचीच खरेदी-विक्री सुरू केली होती. मात्र, त्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती. त्यातच, या बाजारांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्यामुळे सोशल
डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचं दृश्य दिसत होतं. या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने इथलं भाजीमार्केट स्थलांतरीत करण्याचं ठरवलं आहे.

- Advertisement -

खारघरच्या सेक्टर ३५मध्ये भरणार मार्केट!

एपीएमसी मार्केटमधली वाहनांची आणि माणसांची गर्दी टाळण्यासाठी आता इथलं भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतरीत होणार आहे. खारघरच्या सेक्टर ३५मधल्या मोकळ्या भूखंडावर हे मार्केट हलवण्यात येणार असून सध्या तिथे गाळ्यांसाठी,
गाड्यांसाठी आणि लोकांना उभं राहण्यासाठी आखणी करण्यात येत आहे.


CoronaEffect : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला गर्दी करणाऱ्यांना इशारा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -