दादरमध्ये भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून; विक्रेत्याला अटक

पोलीसांकडून फरार भाजी विक्रेत्याचा शोध घेऊन केले अटक

7 year old boy slits throat of his 4 year old cousin during fight over game in bareilly madhya pradesh
हत्या

मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. काल २४ जूनच्या रात्री हा प्रकार रात्री ११ वाजेच्य़ा सुमारास घडल्याने दादर परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते. भाजी विकत घेत असताना केवळ भाजीच्या १० रुपयांवरून वाद झाला असल्याची माहिती मिळते आहे. या भाजीविक्रेत्याचे नाव सोनीलाल असे असून अवघ्या १० रुपयांच्या वादावरून भाजीविक्रेत्याने ग्राहकाला भोसकले, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

उपचारादरम्यान ग्राहकाचा मृत्यू

दादरच्या स्टेशन बाहेरील परिसरात भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये झालेला साधारण वाद विकोपाला जाऊन भाजी विक्रेत्याने चक्क ग्राहकाला चाकूनने भोसकले. चाकू भोसकल्याने जखमी झालेल्या ग्राहकाला लगेच केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी विक्रेत्याचा शोध घेत केली अटक

या मृत झालेल्या ग्राहकाचे नाव मोहम्मद हनीफ असे असून शिवाजी पार्क पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भाजी विक्रेता फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेत त्या भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.

अशी घडली घटना

साकिनाका येथील टिळक नगर येथे राहणारा मोहम्मद हा दादर येथे कामाला आहे, दररोज रात्री घरी जाताना तो दादर येथून फळ, भाजीपाला घेऊन जात असे. सोमवारी नेहमी प्रमाणे रात्री तो सोहनलाल याच्याकडे भाजी खरेदी करीत असताना भाजी विक्रेता सोहनलाल याने त्याला १० रुपयांची जुनी फाटकी नोट दिली, मोहम्मदने ती बदलून मागितली मात्र त्याने बदली करून देण्यास मनाई केली.या वरून दोघात वाद झाला आणि चिडलेल्या सोहनलालने त्याच्याजवळील भाजी चिरण्याचा चाकूने मोहम्मद वर वार केले. मोहमद हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने तेथून पळ काढला होता.