करोनामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले; मुंबईत भाजीपाल्याचे भाव कडाडले

करोनामुळे मुंबईत भाजीपाल्यांची ४० टक्क्याने आवक घटली असून यामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत.

Mumbai
vegetables price hike in mumbai, housewifes budget spoiled
मुंबईत भाजीपाल्याचे भाव कडाडले

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जितक्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होती. तितकी आवक येत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत भाजीपाल्यांची ४० टक्क्याने आवक घटली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भाजीपाल्यांचे दर वाढले असून येणाऱ्या दिवसात आणखी भाव वाढण्याची चिन्ह आहेत.

करोनाचा सर्वसामान्य फटका

करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात रविवारी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. तसेच संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक चाळीस टक्क्यांनी घटली आहे. जनता कर्फ्यूमुळे रविवारी शेतकरी शेतात गेला नाही. तसेच खाजगी वाहने बंद असल्याने ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला मंडित विक्रीसाठी आला नाही. दररोज भायखळा भाजीपाला मंडईमध्ये १ हजार गाड्या येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून भाजीमंडई बंद होती आणि ही मंडई बुधावरी सुरू झाली. तर फक्त ६०० गाड्या भाजी मंडईत दाखल झाल्या. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहे. तसेच येणारी परिस्थिती ती कठीण असल्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याऱ्या ग्राहकांची संख्या वाढली असून कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मेथी, भेंडी, वांगे अशा बऱ्याच भाजी पाल्याचा दर आज सकाळ पासून चढत्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे करोनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत.

तीन दिवसांपूर्वी दहा ते पंचवीस रुपये किलोने मिळणारा भाजीपाला, आज ४० ते ७० रुपये किलोने विक्री होत असल्याचे भाजीपाला भाजी बाजारात दिसून येत आहे. तसेच पूर्वी १५ रुपयांची मेथीची जुडी आज चक्क ४० रुपयांवर पोहोचली तर कांदे शनिवारी ३० रुपये किलो होते ते आज ४५ रुपये किलो झाले आहे. बटाटा शनिवारी ३० रुपये किलो होता तर आज तोच बटाटा ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. हीच परिस्थिती ती अजून काही दिवस राहिली तर गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून भायखळा मंडई बंद होती. मंगळवारी मंडईत दररोजच्या तुलनेत भाजीपाल्यांच्या गाड्या फार कमी आल्या आहेत. पूर्वी १ हजार गाड्या येत होत्या. मात्र, मंगळवारी फक्त ६०० गाड्या आल्या आहेत. भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तूमध्ये येते. त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढवण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे आहे. – किरण झोगडे; अध्यक्ष, भायखळा भाजीपाला मंडई


हेही वाचा – धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा ‘हंता’ व्हायरस; एकाचा मृत्यू


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here