घरमुंबईदादरच्या गोखले रोडवर पार्कींगलाच टोचन

दादरच्या गोखले रोडवर पार्कींगलाच टोचन

Subscribe

महापालिकेच्या कारवाईची वाहनचालकांना भीतीच नाही

मुंबईतील २९ सार्वजनिक वाहनतळांसह महत्वाचे पाच प्रमुख रस्ते पार्किंगमुक्त करण्याचे प्रशासनाने घोषित केल्यानंतरही आजही त्यातील काही रस्त्यांवर सर्रासपणे वाहने उभीच केली जात आहे. यापैकी दादरमधील गोखले रोड मार्गाच्या काही भाग प्रायोगिक तत्वावर पार्किंगमुक्त करण्यात आला. परंतु, या रस्त्यावर आजही वाहने उभी असून बस थांब्याच्या परिसरातही स्थानिक रहिवाशांकडून वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईची वाहन चालकांना भीतीच राहिलेली दिसत नाही.

मागील ३० ऑगस्ट २०१९ पासून मुंबईतील महत्त्वाच्या पाच रस्त्यांचा काही भाग प्रायोगिक तत्वावर ‘पार्किंग मुक्त’ करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केली. त्यामध्ये दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व दादरचा गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सुमारे १४ किमीच्या अंतराच्या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ‘पार्किंग मुक्त’ असतील, असेही महापलिकेने स्पष्ट केले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने या पाच रस्त्यांच्या काही भागात राबविण्यात येणार्‍या ‘पार्किंग बंदी’सह मुंबईतील सर्व बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ५० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सह आयुक्त तथा उपायुक्त आणि विभागीय सहाय्यक आयुक्त यांना दिले होते. त्यामुळे पार्किंग केलेल्या वाहनांवर दहा हजार रुपये दंड आकारण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते.

- Advertisement -

दक्षिण मुंबईतील दादर परिसरातील गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल.जे.रोड जंक्शन दरम्यानच्या मार्गावर पार्किंगमुक्त करण्यात आला असला तरी या भागातील रस्त्यावर मंगळवारी मोठ्याप्रमाणात वाहने दिसून आली. महापालिकेच्यावतीने कारवाई होत असली तरी वाहन चालक आणि मालकांमध्ये महापालिकेची भीती नसल्यामुळे बिनधास्तपणे नियम आणि आदेश मोडून वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे नक्की हा रस्ता पार्किंगमुक्त आहे का असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

गोखले रोडवरील काही भाग प्रायोगिक तत्वावर पार्किंगमुक्त करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०१९पासून ही कार्यवाही करण्याचे आदेश असले तरी मागील सोमवारपासून या रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत आठ दिवसांमध्ये २४ दुचाकी व चार चाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे अडीच लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. याठिकाणी वाहनांच्या चाकाला क्लॅम्प बसवला जातो. त्यामुळे कदाचित याठिकाणी वाहने उभी असल्याचे दिसत असतील. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे सध्या तरी ही कारवाई धिम्या गतीने वाटत असली तरी भविष्यात ती कडक करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत. – किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी/उत्तर

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -