मुंबई विद्यापीठात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं व्याख्यान

सहकार क्षेत्रामध्ये लक्ष्मणराव इनामदार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या आठवणींना आणि आदर्शांना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये व्याखान आयोजित केलं गेलं आहे

Mumbai
Venkaiah Naidu interacting with the media

मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याखानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. सहकार क्षेत्रामध्ये लक्ष्मणराव इनामदार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या आठवणींना आणि आदर्शांना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये व्याखान आयोजित केलं गेलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. उदय जोशी देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ सप्टेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकार संमेलन कार्यक्रम झाला. त्यासाठी निमित्त होतं ते जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ. सहकारी संस्थांमध्ये परस्पर समन्वय, परस्पर पूरकता आणि आपुलीची भावना व्यक्त करुन एक सुसंघटीत सहकार शक्ती उदयाला यावी. तसेच या शक्तीच्या बळावरच सहकारी क्षेत्रासमोरील प्रश्नांची उकल होऊ शकेल असा विश्वास देणाऱ्या लक्ष्मणराव इनामदारांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या योगदानाची महती सर्वदूर व्हावी यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या स्मृती व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here