घरमुंबईव्हिडिओ कॉलवर केला महिलेचा विनयभंग; विकृताला अटक

व्हिडिओ कॉलवर केला महिलेचा विनयभंग; विकृताला अटक

Subscribe

व्हिडिओ कॉलवरून एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका विकृताला वर्सोवा पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे.

मुंबईत विनयभंगाच्या अनेक घटना समोर येत असून त्यातल्या काहींना अटकही झाली आहे. मात्र, एका विकृताने थेट मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉल करून मुंबईतल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या विकृताला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने त्याची ४ दिवसांच्या ट्रांझिट रिमांडमध्ये रवानगी केली आहे. सदर महिला ही समाजसेविका असून हा विकृत उत्तराखंडचा असल्याची बाब समोर आली आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवण्याचं काम करतो.

काय केलं विकृतानं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीत राहाणाऱ्या आणि जे.पी. रोड परिसरात कार्यालय असलेल्या या समाजसेविकेला गेल्या काही दिवसांपासून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हिडिओ कॉल येत होते. क्रमांक ओळखीचा नसल्यामुळे त्या तो कॉल घेत नव्हत्या. मात्र, ३ ऑगस्टला पुन्हा रात्री उशीरा त्यांना त्याच क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. अखेर कंटाळून त्यांनी तो कॉल घेतला, तर पलीकडे असणाऱ्या व्यक्तीने अंगावर काहीही कपडे घातले नव्हते. हे लक्षात येताच त्यांनी तो कॉल कट केला आणि पोलिसांच्या कंट्रोल रूमला ही माहिती दिली. कंट्रोल रूमने स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत अभिनेत्रीचा विनयभंग करुन फसवणूक; फोटोग्राफरविरुद्ध गुन्हा दाखल

दुसऱ्याचा मोबाईल क्रमांक वापरून करायचा चाळे

वर्सोवा पोलिसांनी तपास केला असता हा कॉल उत्तराखंड येथून आला असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक उत्तराखंडला रवाना झालं आणि त्यांनी सदर तरुणाला अटक केली. राजेशकुमार बहादूरराम असं या २७ वर्षीय विकृत तरुणाचं नाव असून तो टॅक्सी चालवण्याचा धंदा करतो. उत्तराखंडच्या पिथौरगड बेरीनागच्या पिपली जाबुकर गावचा तो रहिवासी आहे. तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक देखील त्याच्या नावावर नसून एका महिलेच्या नावावर आहे. त्याला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -