ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनावर मात

कोकिलाबेन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांना कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर काढले

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यापूर्वीच बायपास सर्जरी झाली आहे. कोकिलाबेन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांना कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर काढले. मधु मंगेश कर्णिक आता पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, या कठीण प्रसंगात त्याच्यासह सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, डॉ. अलका मांडके, रवींद्र आवटी, कोमसापचे प्रा. अशोक ठाकूर, नमिता व रमेश कीर ही मंडळी होती. हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर मधु मंगेश कर्णिक`प्राप्तकाल’ ही कादंबरी लिहित होते. आता ही कादंबरी पू्र्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मधुभाईंना अजून एक महिनाभर कुणी संपर्क करू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.


चिंताजनक! महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी; केंद्राची आकडेवारी जारी