घरमुंबईकल्याण 'आयएमए'च्या गणेशोत्सव स्पर्धेत' विजय तरुण मंडळाची बाजी

कल्याण ‘आयएमए’च्या गणेशोत्सव स्पर्धेत’ विजय तरुण मंडळाची बाजी

Subscribe

इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचे आज निकाल लागले.

उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते. आज या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. या स्पर्धेत विजय तरुण मंडळाने प्रथम, सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाड्याने द्वितीय तर जोशीबागेतील शिवनेरी क्रीडा मंडळाच्या देखाव्याने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

आरक्षणावर आधारित देखाव्याने पटकावला प्रथम क्रमांक

गणेशोत्सव स्पर्धेसाठी यंदा उदंड प्रतिसाद लाभला. कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील तब्बल ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सहभागी झाली होती. प्रथम आलेल्या विजय तरुण मित्र मंडळाने आरक्षणावर आधारित देखावा साकारला होता. तर यंदा १२५वे वर्ष साजरे करणाऱ्या सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऐतिहासिक घटनांवर आधारित आणि शिवनेरी क्रीडा मंडळाने गणेशोत्सवाची स्थित्यंतरे आणि सद्यस्थिती या विषयावर आधारित देखावे साकारले आहेत.

- Advertisement -

Vijay Tarun Mandal wins in Kalyan 'IMA' Ganeshotsav competition २

 

- Advertisement -

उत्कृष्ट गणेशमूर्तीचा किताब त्वष्टा कासार गणेश मंडळाला

तर उत्कृष्ट गणेशमूर्तीचा किताब कासारहाटातील त्वष्टा कासार गणेश मंडळ (प्रथम), गणेशप्रेमी मित्र मंडळ, दुधनाका (द्वितीय) आणि रामबागेतील प्रबोधन मित्र मंडळाने (तृतीय) पटकावला. तसेच कल्याण पूर्वेतील क्रिएटिव्ह ग्रुप प्रतिष्ठान, कल्याण पश्चिमेतील श्री गणेशोत्सव मित्र मंडळ, सिंहगर्जना मित्र मंडळ, बालगणेश मित्र मंडळ आणि टिळक चौकातील श्री छत्रपती शिवाजी मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा – पाहा – ऐश्वर्या राय- बच्चनच्या डोहाळे जेवणाचे फोटो

Vijay Tarun Mandal wins in Kalyan 'IMA' Ganeshotsav competition ३

हे होते परीक्षक

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला दिग्दर्शक राजेश पवार, शिल्पकार प्रशांत गोडांबे, शिक्षणतज्ञ भरत विशे, क्रिएटिव्ह डायरेक्टर सौरभ पवार आदींनी काम पाहिले. तर कल्याण आयएमचे अध्यक्ष प्रदीप कुमार सांगळे, डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. प्रशांत खताळे यांच्यासह कल्याण आयएमएच्या सर्वच सदस्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

‘मेडीकल हेल्प डेस्क’

दरम्यान कल्याण आयएमए आणि मिरा, शुश्रुत, सुखकर्ता आणि आयुष हॉस्पिटलतर्फे कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावर ‘मेडीकल हेल्प डेस्क’ उभारण्यात आला आहे. ज्याद्वारे विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि कोळी बांधवांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -