घरमुंबईआरक्षित जागेच्या सर्वेक्षणास गावकर्‍यांनी केला विरोध

आरक्षित जागेच्या सर्वेक्षणास गावकर्‍यांनी केला विरोध

Subscribe

प्रखर आंदोलनाचा इशारा

मलउद्ंचन केंद्राच्या (सिव्हरेज प्लॅन्ट) जागेचे सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या पाच अधिकारी व कर्मचार्‍यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी गौरीपाडा येथे सर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना गावकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्थानिक गावकर्‍यांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शविल्याने शासनाचे अधिकारी हात हलवत परतले.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा गावातील गुरचरण जागेवर काशी कापडी समाजासाठी जागा आरक्षित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आले होते. मात्र गावकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. यावेळी गावकर्‍यांनी अधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

शासनाकडून स्थानिकांच्या जागांवर आरक्षणे टाकली जात आहेत. मात्र विकासाची भूमिका म्हणून आम्ही विरोध केला नाही. मात्र सातत्याने अन्याय होत असल्याने तो सहन करणार नाही. आगरी व कोळी समाज एकत्रित झाला आहे. त्यामुळे शांतता आणि कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे ठरवले आहे. मात्र सरकार आमच्या जमिनी हिसकावून घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. नेवाळीपेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आगरी कोळी उत्कर्ष समाजाचे नेते विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -