घरमुंबईरात्रीच्या अंधारत विनायक मेटेंनी उरकलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

रात्रीच्या अंधारत विनायक मेटेंनी उरकलं शिवस्मारकाचं भूमिपूजन

Subscribe

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गुपचूप शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्यावेळी मुंबईत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी रात्रीच्या अंधारात पुजाऱ्यांना घेऊन गुपचूप भूमिपूजन केले असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मेटे यांनी भाजपलाही विश्वासात घेतले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच भाजपने या प्रकारावर नाराजी व्यक्त केले असून रात्रीच्या अंधारात भूमिपूजन करणे योग्या नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे.

हे वाचा – शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी नवा मुहूर्त?

न्युज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. २४ ऑक्टोबर रोजी मोठा गाजावाजा करत मेटे यांनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित केला होता. परंतु कार्यकर्ते आणि पत्रकारांनी भरलेल्या बोटीला अपघात झाला आणि यामध्ये सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले गेले होते. त्यानंतर भूमिपूजनाचा सोहळा होणार नाही, असे मेटे यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर मेटे यांनी पुजारी आणि मोजक्या लोकांना घेऊन शिवस्मारकाचे भूमिपूजन केले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

डंप केलेल्या स्क्रॅप बोटीमुळे घडला शिवस्मारक परिसरात अपघात


घिसाडघाईमुळे शिवस्मारक भूमिपूजनाला सुरूंग

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -