घरमुंबई'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत; आता भाजप करणार मनसेची पोलखोल

‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत; आता भाजप करणार मनसेची पोलखोल

Subscribe

भाजप 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मनसेची पोलखोल करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या जाहिर सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणतं भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आता त्याला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहेत. येत्या २७ तारखेला भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मनसेची पोलखोल करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. या सभेमध्ये भाजपा सर्व व्हिडिओ लोकांसमोर आणून राज यांचे आरोप खोडून काढणार असल्याची माहिती तावडे यांनी आज, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भाजप आता कोणते व्हिडिओ लोकांसमोर आणणार याची उत्सुकता मनसेला असणार आहे.

मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष्मी दर्शन सुरु 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी काळाचौकी येथे जाहीर सभा घेत योगेश चिले या कुटुंबाचा फोटो कशा पद्धतीने भाजपाने खोट्या जाहिरातीसाठी वापरला याचे वास्तव राज ठाकरे यांनी मांडत राज यांनी चिले कुटूंबाला व्यासपीठावर आणल्याने भाजपाची झोप उडाली. मात्र चिले यांचा फोटो हा भाजपाच्या कोणत्याही अधिकृत पेजवर नसल्याचे विनोद तावडे यांनी हे सांगितले. चिले परिवाराचा फोटो हा न्युयॉर्क टाइम्समध्ये झालेल्या एका मुलाखतीत छापण्यात आला. पाकिस्तानमधील एका साईटवर देखील हा फोटो आहे आणि योगेश चिले हा मनसेचाच कार्यकर्ता असल्याचे तावडे यांनी सांगितले. पाकिस्तान डीपेशच्या पेजवर आहे राज ठाकरे यांनी दाखवला तो आहे? त्यामुळे मनसे पाकिस्तान काही कनेक्शन आहे का?, असा संशय देखील तावडे यांनी उपस्थित केला. तसेच राज ठाकरे पाकिस्तानचा वारवार उल्लेख करतात. मग राज ठाकरे आणि पाकिस्तानचा कनेक्शन काय हे पण तपासले पाहिजे असे देखील तावडे म्हणालेत. तसेच मोदींजींच्या फॅनच्या अनेक साईट आहेत. त्या साईटवर हा फोटो पोस्ट केला गेला, असे तावडे यांनी सांगितले. मनसेचे कार्यकर्ते आता लक्ष्मी दर्शन करत आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येते की राज ठाकरे कुणासाठी काम करत आहेत ते असे देखील तावडे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -