घरताज्या घडामोडीमुंब्रा रेतीबंदर येथे दोन टिकटॉक गटात हाणामारी

मुंब्रा रेतीबंदर येथे दोन टिकटॉक गटात हाणामारी

Subscribe

मुंब्रा रेतीबंदरचा कायापालट लवकरच होणार आहे. मात्र रेतीबंदर प्लॉट क्र. ३ हा टिकटॉक पॉईंट झाल्याचे चित्र आहे. याठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात टिकटॉक व्हिडिओ बनविले जात आहेत. दरम्यान शनिवारी रात्री टिकटॉक बनविण्यासाठी आलेल्या दोन गटात गाडीची धडक लागल्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत दोन तरुणांवर वार करण्यात आल्याची घटना घडली. मुंब्रा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नौफा टिकटॉक ग्रुपच्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी तिघांना न्यायालयात नेले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.

शुक्रवारी रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर येथे खानसाहब टिकटॉक ग्रुप हे टिकटॉक बनविण्यासाठी आले होते. मोहसीन खान, बिलाल, अहमद अशी खानसाहब ग्रुपमधील सदस्यांची नावे आहेत. त्याचवेळी तिथे नौफा टिकटॉप ग्रुपचे नौफा, हबीबा, अशफाकही आले होते. दरम्यान गाडीची धडक लागल्याने झालेल्या वादात नौफा ग्रुपच्या नौफा याने आपल्या मित्राला फोन करून बोलावले. त्यानंतर १० ते १५ जण हत्यारासह घटनास्थळी आले आणि त्यांनी मोहसीन, बिलाल आणि अहमद यांना मारहाण केली.

- Advertisement -

मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक करडे यांनी ही भांडणे पहिली. भांडणात हस्तक्षेप करत तलवारधारी तरुणाला त्यांनी थांबवून मध्यस्थी केली. अन्यथा भांडणे विकोपाला होती. तोपर्यंत चाकूने मोहसीनवर वार करण्यात आले होते. त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मोहसीन याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३२३, ३२४, ५०४, ३४ नुसार कारवाई केली. मुंब्रा पोलिसांनी नौफासह तिघांना अटक करून त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -