घरमुंबईविरार-चर्चगेट लोकलचे तिकीट ३ पैसे

विरार-चर्चगेट लोकलचे तिकीट ३ पैसे

Subscribe

गाडीचे 153 व्या वर्षात पदार्पण

12 एप्रिल 1867 ला पहाटे 6.45 ला पहिल्यांदा धावलेल्या विरार लोकलने 153 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यावेळी प्रति मैल 3 पैसे असलेले प्रवासभाडे आता 5 रुपये झाले आहे. एप्रिल महिन्यातल्या १२ तारखेला पहाटे 6.45 ला धावलेली ही लोकल चर्चगेटला जाऊन सायंकाळी 5.30 ला परतीचा प्रवास करायची. महिलांसाठी या ट्रेनमध्ये दुसर्‍या श्रेणीचा वेगळा डबा होता. याव्यतीरिक्त एक स्मोकींग झोनही होता. त्यावेळी या लोकलमध्ये तीन श्रेणी होत्या. प्रवासी सामान्यतः दुसर्‍या श्रेणीने प्रवास करीत असत. त्याचा दर प्रति मैल 7 पैसे तर तिसर्‍या श्रेणीचा दर 3 पैसे होता. विरार-चर्चगेट हा प्रवास आता दीड तासांचा आहे. त्यावेळी या प्रवासाला यापेक्षा कमी वेळ लागत होता. कारण त्यावेळी फक्त 11 स्थानके होती.

विरार लोकल इतकेच 16 एप्रिल 1853 या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ही देशातील पहिली ट्रेन धावली, पण ती लोकल नव्हती. 1 फेब्रुवारी 1865 ला निघालेल्या वेळापत्रकात लोकल हा शब्द वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला. काळानुरूप लोकलमध्ये खूप बदल होत गेले. 6 डब्यांपासून आता 15 डब्यांची ही लोकल झाली आहे. त्यात महिला स्पेशल,वातानुकूलित लोकलमध्ये वाढ झाली आहे. जगातली पहिली महिला स्पेशल पश्चिम रेल्वेवर धावली. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींदर भाकर यांनी दिली, तर या रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, पण त्यांना पहिल्या विरार लोकलचे महत्त्व माहीत नाही, हे दुर्भाग्य आहे. अशी खंत मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए.के.श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

त्यावेळी आणि आज असलेल्या स्थानकांची नावे
नीअल (नालासोपारा), बसीन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यांमधले स्थानक),बेरेवाला (बोरीवली),पहाडी (गोरेगाव),अंदारु (अंधेरी),सांताक्रूझ,बंदोरा (बांद्रा),माहिम,दादुरे (दादर),ग्रांटरोड अशी स्थानके विरार-चर्चगेट दरम्यान होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -