घरमुंबईतानसा अभयारण्यात दुर्मिल वनपिंगळ्याचे दर्शन

तानसा अभयारण्यात दुर्मिल वनपिंगळ्याचे दर्शन

Subscribe

यापूर्वी मेळघाट व नंदुरबारच्या जंगलात आढळलेले दुर्मिळ असा वनपिंगळा तानसाच्या जंगलात पक्षी निरिक्षकांना आढळून आले. वन पिंगळा म्हणून ओळख असलेली घुबडाची एक दुर्मिळ प्रजात मानली जाते. त्यामुळे येथील पक्षीनिरीक्षक आणि वन, निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. तानसातील वन पिंगळाच्या संवर्धनाचे काम येथील वन्यजीव विभाग व पक्षीनिरीक्षक रोहीदास डगळे यांनी आता हाती घेतले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या 320 चौरस किलोमीटर अभयारण्याचे क्षेत्र आहे. यात तानसा , खडी , वाडा, परळी, सुर्यमाळ असे विस्तीर्ण असे क्षेत्र आहे. तानसाच्या जंगलात एकुण 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यातील 55 पक्षी तानसा तलावाच्या आसर्‍यावर राहत आहेत. यात झाडावर वास्तव्य करणारे 126 पक्षी आहेत. असे तानसा वन्यजीव विभागातून सांगण्यात आले. सध्या हिवाळ्याच्या मोसमात पक्षी दर्शनासाठी पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमी पर्यटकांच्या गर्दीने सध्या तानसा आभयारण्य गजबजुन गेल्याचे चित्र आहे. आता तानसा तलाव व आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील दुर्मिळ पक्षी हिवाळ्याच्या पक्षी निरीक्षकांना रोज नजरेस पडत आहेत. तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळद्या, नाचन, घुबड,

- Advertisement -

पिंगळ्या, खारीक, टक्कोचोर, सुतार, टटवी खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता , गरुड , घार ,सादबहीणी, करकोचा, पोपट ,मोर अनेक पक्षी तानसा अभयारण्यात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -