घरमुंबई... किमान सुरक्षा यंत्रणा तरी द्या

… किमान सुरक्षा यंत्रणा तरी द्या

Subscribe

म्हाडाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागप्रमुखांचे साकडे

म्हाडात दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमचा प्रस्ताव कोट्यवधी रूपयांनी फुगल्याने प्राधिकरण बैठकीत कोणताही निर्णय न होता हा प्रस्ताव रखडला. आता दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतरही दक्षता आणि सुरक्षा विभागाची किमान यंत्रणा पुरवण्याची गरज पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कमीत कमी पैसे खर्च करून यंत्रणा उभारा, अशी मागणी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी संजय कुमार वर्मा केली आहे.

म्हाडा मुख्यालयात प्रत्येक गेटवर किमान एक संगणक, कॅमेरा, प्रिंटर आणि एक सर्व्हर यासारखी मूलभूत व्यवस्था सुरक्षिततेच्यादृष्टीने अपेक्षित आहे. यासाठीचा खर्च हा साधारणपणे कमाल १५ लाख ते २० लाख रुपयांच्या घरात असू शकतो. म्हाडात दररोज विविध कामांच्या निमित्ताने ३ हजार व्हिजिटर्स येतात. त्यापैकी बहुतांशजण हे म्हाडाच्या कार्यालयात येतात. पण वारंवार एकाच विभागात येणारे आणि अनेकांची कामे घेऊन येणारी लोक यांच्यावर आमच्या यंत्रणेतील लोक लक्ष ठेवून आहेत. अनेकवेळा फसवणुकीचे झालेले प्रकार पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून एजंटची माहिती सिस्टिममध्ये उपलब्ध होईल. सध्या मॅन्युअल पद्धतीनेच म्हाडात येणार्‍या व्हिजिटर्सची माहिती घेण्यात येते.

- Advertisement -

एजंटचे फोटो लागले, काढले                                                                                            म्हाडाच्या मुख्यालय परिसरात अनेक विभागांमध्ये वारंवार फिरणारे एजंट रोखण्यासाठी विभागाकडून प्रवेशद्वारावरच नोटीस बोर्डावर फोटो लावण्याची शक्कल लढवण्यात आली होती. मात्र फोटोंबाबत काहींनी आक्षेप घेतल्यामुळे हे फोटो तत्काळ काढून टाकण्यात आले. म्हाडा कार्यालयात येण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, म्हणूनच सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून विविध विभागात फिरणार्‍यांवर सुरक्षा रक्षकांचे लक्ष असेल, असे वर्मा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -