उल्हासनगरमध्ये शस्त्रसाठा बाळगणाऱ्या तरुणांना अटक

घातपात करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mumbai
vithalwadi police arrested two youths with weapons in ulhasnagar
शस्त्रसाठा बाळगणाऱ्या तरुणांना अटक

उल्हासनगरमध्ये शस्त्रसाठा घेऊन आलेल्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल उर्फ कारा राजेश जंगारे (२१) आणि नरेंद्र सुरेंद्र करोतीया (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

२ लाखांचा मुद्देमाल जप्त

उल्हासनगर ४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला कॅम्प येथील कालिका माता मंदिराजवळ आज सकाळच्या सुमारास काही इसम मोटारसायकलवर घातक शस्त्र घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला कॅम्प परिसरात सकाळी सापळा रचला होता. दरम्यान, दुचाकीवरुन दोन इसम आले. त्यांच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांना त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्या ठिकाणावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे. राहुल उर्फ कारा राजेश जंगारे (२१) आणि नरेंद्र सुरेंद्र करोतीया (२३) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ देशी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, तलवार, सोन्याची चैन, ४ मोबाईल , २ पल्सर मोटारसायकल, असा १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.