घरमुंबईछोट्या पक्षाच्या भाऊगर्दीने मतांचे विभाजन होणार

छोट्या पक्षाच्या भाऊगर्दीने मतांचे विभाजन होणार

Subscribe

युती, आघाडीच्या उमेदवारांना टेन्शन

शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील लढत प्रमुख आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांती सेना, आंबेडकरराईट पार्टी, राष्ट्रीय समाजवादी पार्टी सेक्यूलर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, जन अधिकार पार्टीसह अनेक पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. या छोट्या छोट्या, स्थानिक पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने मतांचे विभाजन होण्याची भीती ठाण्यातील दिग्गजांना वाटत आहे. या उमेदवारांमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मतही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय समाजवादी पार्टी (सेक्युलर)च्या वतीने हेमेंद्र बोसमीया निवडणूक लढविणार आहेत. बोसमीया हे बांधकाम व्यावसायिक आहेत. राज्यातील दलित आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, फसवा जाहीरनामा, बेरोजगारी सारखे विषय घेऊन राष्ट्रीय समाजवादी पार्टी (सेक्युलर) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेश सोनावणे यांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान युवकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन देऊन देखील या सरकारने अद्याप मागे घेतले नाहीत. बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेकरिता अद्याप निधी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक जिह्यात वसतिगृह निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले. 72000 इतकी मेघा नोकर भरती करून त्यात मराठा समाजाला 16 टक्के राखीव कोटा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र ती भरतीच अद्याप सुरु झाली नाही. अशी अनेक आश्वासने देऊन सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. त्याच्याच विरोधात मराठा क्रांती सेना निवडणुक रिंगणात उतरली आहे.

- Advertisement -

ठाण्यामधून उद्योगपती रविंद्र साळुखे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा मराठा क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे. सुमारे 15 वर्षे राष्ट्रवादीत कार्यरत असलेले साळुखे यांनी दोन वर्षे शिवसेनेतही काम केले आहे. मात्र आपणास दिलेली दुय्यम वागणूकीला कंटाळून आपण मराठा क्रांती सेनेत दाखल झालो असून पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडून असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील महापालिकेची दगडी शाळा, नौपाड्याची शाळा, राबोडीतील शाळा कोणी कोणी करार करून ताब्यात घेतल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा वागळे औद्योगिक विभाग पूर्णपणे भकास झाला. तेथील कामगार ठेकेदारी कुणाकडे? रस्ता रुंदीकरणात उध्वस्त झालेल्या झोपडीधारक आणि क्लस्टर योजनेवर विद्यमान खासदारांनी काही मत मांडतांना ऐकले आहे का ? स्मार्ट सिटीचा निधी कोठे वापरावा? याचाच ध्यास असलेल्या या लोकप्रतिनिधींना आता त्यांची जागा दाखवणारच असे जाहीर करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी देखील यावेळी ठाण्याच्या रिंगणात आहे. ठाण्यातील प्रभाकर जाधव यांना उमेदवारी दिली आहे. संपूर्ण ताकदीनिशी यावेळी विद्यमान खासदारांना पाडणार असा विश्वास पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष प्रविण प्रतापे यांनी व्यक्त केला. प्रभाकर जाधव हे पत्रकारच नव्हे तर लेखक साहित्यिकही आहेत. तसेच ते चित्रपट निर्माते म्हणूनही परिचित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -