‘वाडिया’ला वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!

Mumbai

संपूर्ण लालबाग परळ ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलं अस परळ येथील वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिका हॉस्पिटलचे अनुदान थकवून ठेवल्याने हॉस्पिटलमधील कर्मचारी व रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे रुग्णालय बंद होऊ नये व विविध मागण्यांसाठी वाडिया हॉस्पिटलमधील कर्मचारी व लाल बावटा जनरल कामगार युनियन अनेक मागण्यांसाठी लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष मधुकर परब व जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करत आहेत.

महापालिका व राज्य शासनाने ग्रँट दिलेली नाही, हे कारण सांगून वाडिया व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही तसेच निवृत्ती (रिटायर) कामगारांचे पेन्शन बंद केले आहेत. या कृत्याला युनियने तीव्र विरोध केला असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदर बाबतीत त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

महापालिका व राज्यशासन अनिवार्य रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर काही आक्षेप घेऊन ग्रँट रोखून धरला आहे त्याबद्दल शासनाने समिती नेमली आहे. याला जास्त कालावधी तसेच अनेक महिने जात असून मुंबईतील कामगार कष्टकरी जनतेच्या रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.

कामगारांच्या मुख्य मागण्या –

१- महाराष्ट्र शासनाने वारिया रुग्णालयाची ११० कोटी अनुदानाची थकबाकी त्वरित द्यावी.

२- नौरोसजी वाडिया कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी १० कोटी १० लाख एवढी असून ती त्वरित द्यावी.

३- नौरोसजी वाडिया रुग्णालयाला सातवे वेतन जानेवारी २०१९ पासून लागू करावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here