‘या’ कारणामुळे तब्बल ११० तासांनी वृध्दाचा मृतदेह मिळाला नातेवाईकांच्या ताब्यात!

या वृध्दाचा कोरोना चाचणीचा अहवाल न आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला नव्हता.

story us recorded 1813 coronavirus deaths in the past 24 hours bringing total to 84059 says johns hopkins university
धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत १ हजार ८०० जणांचा कोरोनामुळे बळी

राज्यात कोरोनापासून वाचण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. पण यामुळे अनेकवेळा कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास विलंब लागत आहे. अनेकवेळा अचानक झालेल्या मृत्यूनंतरही कोरोनाची चाचणी घेतली जाते. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास विलंब झाल्याने दहिसर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकच्या मृत्यूनंतर तब्बल ५ दिवसांनी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात आला आहे.

या वृध्दाचा कोरोना चाचणीचा अहवाल न आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला नव्हता. त्यामुळे तब्बल ११० तासांनी नातेवाईकांना मृतदेह घेण्याची वेळ आली.

दहिसर परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करणारे अमरनाथ यादव हे शुक्रवारी दुपारी औषधे खरेदी करण्यासाठी जात असताना चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. त्यावेळी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. मात्र रूग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईकांनी मागील चार दिवसांपासून रुग्णालयात खेपा घालूनही मृतदेह ताब्यात मिळाला नाही. कोरोनाची चाचणी प्रलंबित असल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला नव्हता. अखेर बुधवारी त्यांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला गेला.


हे ही वाचा – औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा अचानक मृत्यू, कोरोना चाचणी केली पण…