घरमुंबईरेल्वे प्रवाशांना हॉटस्पॉटसाठी वेटिंग !

रेल्वे प्रवाशांना हॉटस्पॉटसाठी वेटिंग !

Subscribe

- रेल्वेला मिळणार दीड कोटीचा महसूल

प्रवांशाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक लोकल डब्यात हॉटस्पॉट बॉक्स लावण्याच्या निर्णय मध्य रेल्वेने नुकताच घेतला. यासाठी रेल्वेकडून निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटस्पॉट बॉक्स सेवा सुरू झाल्यानंतर यातून रेल्वेला दरवर्षी १ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. लोकल डब्यात प्रवाशांना ही सुविधा मिळणासाठी 2020 साल उजाडणार आहे. कारण लोकलच्या 1600 डब्यांमध्ये हॉटस्पॉट बॉक्स लावण्यासाठी मध्य रेल्वेने 120 दिवसांचा कालावधी कंपनीला दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवासात मुंबईकरांचा बराच वेळ जातो. लोकलमध्ये मोबाईलचा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे प्रवाशांची कामेही खोळंबतात. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि गाडीत प्रवांशाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक लोकल डब्यात हॉटस्पॉट बॉक्स लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वेने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कामासाठी तब्बल 120 दिवसांच्या कालावधी मध्य रेल्वेने कंपनीला दिला आहे. याकामाची सुरूवात झाली आहे. यासाठी रेल्वेला काही खर्च पडणार नाही. उलट रेल्वेला वर्षाला 1 कोटी 5० लाख रूपये या खासगी कंपनीकडून मिळणार आहेत.

- Advertisement -

धावत्या रेल्वेमध्ये हॉटस्पॉट बॉक्सची सेवा देण्याचा भारतीय रेल्वेतील हा पहिलाच प्रयोग आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार एसटीच्या बसेसमध्ये अशाच प्रकारे हॉटस्पॉट बॉक्स लावण्यात आले होते. मात्र सततच्या तांत्रिक बिघाडमुळे ही योजना निष्फळ ठरली होती. त्यानंतर आता एसटीप्रमाणेच लोकलच्या डब्यातसुध्दा अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी नामवंत कंपनीला याची निविदा काढून कंत्राटसुध्दा देण्यात आले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये तांत्रिक चाचणी सुरू आहे.

चार महिने लागणार
मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांची एकूण संख्या 131 आहे. लोकलच्या दररोज 1732 फेर्‍या होतात. या माध्यमातून दररोज 42 लाख प्रवासी प्रवास करतात. या 131 लोकल गाड्यांचे एकूण डबे 1 हजार 602 आहेत. या सर्व डब्यांना हॉटस्पॉट बॉक्स लावण्यासाठी तब्बल ४ महिन्यांचा कालावधी रेल्वेने कंपनीला दिला आहे. यांची चाचणी कुर्ला कारशेडमध्ये यशस्वी झाली आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम कंपनीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

रेल्वेच्या महसूलात पडणार भर
भारतीय रेल्वेचे उप्तादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत रेल्वेत महसूल वाढवून देण्यासाठी अनेक उपक्रम रेल्वे विभागाकडून राबविण्यात येत आहेत. त्यातील एक उपक्रम म्हणजे लोकल डब्यात हॉटस्पॉट बॉक्स लावणे हा आहे. यामुळे प्रवाशांना मनोरंजनाची सोय होईल. सोबतच रेल्वेलासुध्दा यातून उत्पन मिळणार आहेत. यासाठी मध्य रेेल्वेला वर्षाला 1 करोड 5 लाख एका खासगी कंपनीकडून मिळणार आहे. जर भविष्यात हा प्रकल्पला यश आले तर रेल्वेच्या महसूलात भर पडेल.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -