घरमुंबईलग्नासाठी 'एसटी कर्मचारी'च हवा..! सोशल मीडियावर तरुणीची हाक

लग्नासाठी ‘एसटी कर्मचारी’च हवा..! सोशल मीडियावर तरुणीची हाक

Subscribe

एकीकडे हैदराबादमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघालेले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एक सुखद धक्का देणारी घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहकांनी भररस्त्यात दोन मैत्रिणींची छेड होत असताना पाहून त्यांचा जीव वाचवला होता. त्यांचे उपकार म्हणून सध्या मॉडेलिंग करणाऱ्या ‘त्या’ मुलीने एस. टी. महामंडळशी नाते अतूट ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिने चक्क सोशल मीडियावर लग्नासाठी ‘एसटी कर्मचारी’च हवा, अशी पोस्ट शेअर केली आहे.

राखी (नाव बदलवून) सध्या खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर असून वेळात वेळ काढून मॉडेलिंगसुद्धा करते. राखी हे सर्व करताना तिला अद्यापही एसटीची ओढ कमी झालेली नाही. यामागचे कारणही अगदी हृदयाला लागणारे आहे. राखी रत्नागिरी येथील कॉलेजला जाण्यासाठी नेहमीच एसटी बसने प्रवास करायची. त्यावेळी राखी कमी वयाची असल्याचे स्वभावात बराच अल्लडपणा आणि हट्टीपणा होता.

- Advertisement -

एकदा संध्याकाळच्या वेळी राखी बगीच्या समोरील रस्त्याने जात असताना चार ते पाच गुंडांनी राखी आणि तिच्या मैत्रिणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघींही गुंडापासून बचावासाठी आरडाओरडा केला. परंतु त्यावेळी रहदारी कमी असल्यामुळे दोघींना कोणाचीही मदत मिळाली नाही. त्याचवेळी रत्नागिरी डेपोची बस रस्त्याने जात असताना एसटी चालकाने हे दृश्य पाहिले आणि बस थांबवली. एसटी चालक त्या गुंडांना मारायला पुढे सरसावले. बसमधील प्रवासी देखील त्यांच्या बचावाला आल्यामुळे गुंडांनी पळ काढला. त्या चालकाचे नाव वसंत चौधरी होते. सध्या ते सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या मुलाकडे राहत आहेत.

राखीच्या वडिलांनीही एसटी महामंडळात सेवा दिली आहे. राखीसुद्धा एसटी महामंडळाची डीटीओ अधिकारीपदाची परीक्षा देत आहे. राखी आधीपासूनच दिलखुलास असल्याने एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधते. सध्या घरात २४ वर्षीय राखीच्या लग्नाची सुरू असून त्यामुळे राखीने सुद्धा लग्न करेन तर फक्त एसटी कर्मचाऱ्याशीच, असा चंग बांधला आहे.

- Advertisement -

काय लिहलं पोस्ट मध्ये?

राखी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहते की, माझ्या सारखा मनमोकळा असेल. माझं वय २४ वर्षे आहे, मला मुलगा समवयस्क, निर्व्यसनी, अविवाहित, सदाचारी, हसून जीवन जगणारा, सावळा/गोरा, उंच असा हवा आहे.

हेही वाचा – 

पंकजा मुंडे भाजपमध्येच होत्या, आहे आणि पुढेही राहणार; पाटील यांची प्रतिक्रिया

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -