घरमुंबईजलपर्णीचा पाणी प्रश्न प्रलंबित; पाटबंधारे - एमआयडीसीचे अधिकारी गैरहजर

जलपर्णीचा पाणी प्रश्न प्रलंबित; पाटबंधारे – एमआयडीसीचे अधिकारी गैरहजर

Subscribe

जलपर्णी सारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पाटबंधारे आणि एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित होते. अत्यंत निंदनीय बाब असून या अधिकाऱ्यांवरच कारवाई झाली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया वालधुनी जल बिरादरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत दायमा यांनी दिली आहे .

लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारी उल्हास नदी ही जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. जलपर्णीमुळे कल्याण, उल्हासनगर भिवंडी आदी शहराच्या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उल्हासनगर महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी पाटबंधारे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीस पाटबंधारे आणि एमआयडीसीचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे पुन्हा एकदा कल्याणसह उल्हासनगर आणि भिवंडीच्या नागरिकांचा पाणी प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

पाटबंधारे – एमआयडीसीचे अधिकारी गैरहजर

उल्हास नदीमधून एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम प्राधिकरण आणि सेंच्युरी रेयॉनला पाणी पुरवठा करण्यात येतो आणि त्यानंतर एमआयडीसीकडून उल्हासनगरला पाणीपुरवठा होतो. मात्र उल्हास नदी गेल्या अनेक वर्षांपासून जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. जलपर्णीच्या पाण्यातील ऑक्सिजन खेचून घेत असल्याने त्याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत आहे. काही महिन्यांपूर्वी वज्र संघटन आणि वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी जलपर्णीमुळे उल्हास नदीची झालेली व्यथा सोशल मीडियावर व्यक्त केली होती.

- Advertisement -

या जलपर्णीमुळे पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. या पिवळसर पाण्याचा अनुभव सेंच्युरी रेयॉनच्या विश्रामगृहात राहणारे आयुक्त अच्युत हांगे यांना आला आहे. हा प्रकार गांभीर्याने घेऊन हांगे यांनी पाणी पुरवठा अभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांना २२ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पवार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय नंन्नावरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, स्टेम प्राधिकरण आणि सेंच्युरी रेयॉनचे संबंधित अधिकारी यांना पत्र देऊन बैठकीला बोलवण्याचे आदेश दिले होते. चंद्रगुप्त सोनवणे यांनी संबंधितांना तसे पत्र देखील दिले होते. मात्र या महत्वाच्या बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक, सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास, ब्रिगेडियर मनोहर थोमस यांनीच उपस्थित दर्शवली होती. मात्र याकडे पाटबंधारे, एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. पाटबंधारे आणि एमआयडीसी अधिकारी जलपर्णीच्या समस्येला गांभीर्याने घेत नसून आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जलपर्णीबाबत साकडे घालण्यात येणार असल्याचे अच्युत हांगे यांनी सांगितले.


वाचा – उल्हास नदीत जलप्रदूषण – जलपर्णी समस्या

- Advertisement -

वाचा – अर्धवट जलशुद्धीकरण प्रकल्पाचा उल्हास नदीला धोका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -