घरमुंबईमाझगाव गार्डनजवळ जलवाहिनी फुटली; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

माझगाव गार्डनजवळ जलवाहिनी फुटली; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

Subscribe

भायखळा पूर्व येथील माझगावमधील बेलवेदर रोडवर माझगाव गार्डनजवळ दुपारी दीडच्या सुमारास रस्त्याखालील जलवाहिनी फुटली.

भायखळा पूर्व येथील माझगावमधील बेलवेदर रोडवर माझगाव गार्डनजवळ दुपारी दीडच्या सुमारास रस्त्याखालील जलवाहिनी फुटली. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे संध्याकाळपर्यंत मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जावू लागल्याने तातडीने या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या, बुधवारी सकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने माझगाव आणि भायखळ्यातील काही भागांमध्ये सकाळी पाण्याचा पुरवठा होवू शकणार नाही. त्यामुळे माझगावकरांची होळी कोरडी जाण्याची शक्यता आहे.

हजारो लिटर पाणी वाया 

भायखळा पूर्व बेलवेदर रोडवरील माझगाव गार्डन जवळ असलेल्या जामजाम मिठाईवाला दुकानासमोर रस्त्याखालील २४ इंच व्यासाच्या जलवाहिनी गळती लागली होती. जमिनीखाली जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. या भागात पाणी पुरवठा नसल्याने प्रारंभी याची गंभीरता लक्षात आली नाही. परंतु त्यानंतर मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जावू लागल्याने जलअभियंता विभागाच्यावतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आली.

- Advertisement -

सकाळच्या वेळेतील पाणी पुरवठा बंद

जमिनीखाली जलवाहिनी असल्याने प्रारंभी त्याचा अंदाज येत नव्हता. त्यानंतर जलअभियंता विभागाच्या गळती शोधक पथकाच्यावतीने याच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. ई विभागाचे सहायक आयुक्त नितीन आर्ते आणि जलअभियंता विभागाचे अभियंते जीवन पाटील मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीचे काम बुधवार पहाटेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. परंतु माझगाव व भायखळा या भागांमध्ये सकाळच्या वेळेत पाणी पुरवठा होतो. पण या दुरुस्तीच्या कामांमुळे सकाळी पाणी पुरवठा होणार नसून दुपारपर्यंत या भागाला पाणी सोडण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -