घरमुंबईआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाणी टंचाईच्या झळा !

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाणी टंचाईच्या झळा !

Subscribe

टँकर बैलगाडीने पाणी पुरवठा

शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या बहुतांश आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असताना आदिवासी विद्यार्थ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. असंख्य आश्रमशाळांमधल्या बोअरवेल नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्याची मोठी गैरसोय येथे सुरू आहे. बोअरवेल व्यतिरिक्त गेल्या काही वर्षात पाणीपुरवठ्याचा अन्य स्त्रोतही उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात आला नसल्याने पाणीपुरवठ्याच्या एकाच पर्यायावर येथील आश्रमशाळांना अवलंबून रहावे लागत आहे.

सद्यस्थितीत तालुक्यातील काही आश्रमशाळांना बैलगाडी अथवा टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर येऊन ठेपली आहे. तालुक्यातील सुसरवाडी, टेंभे, मोरोशी, टाकीपठार, कोठारे आणि खर्डी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुलामुलींच्या अर्थात दोन्ही वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना पाणी समस्या अधिकच भेडसावत असल्याची वस्तुस्थिती आहे.

- Advertisement -

आश्रमशाळांना टंचाई परिस्थितीत बैलगाडीनेच पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरवर्षी या पाणीपुरवठ्यापोटी लाखो रुपये खर्च होत आहेत. पाणी समस्या सोसणार्‍या आश्रमशाळांच्या पाणीपुरवठ्याची महत्त्वाची गरज भागविण्याची जबाबदारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर येऊन पडली आहे. तालुक्यातील बहुतांश आश्रमशाळांना बाहेरून टँकरने अथवा बैलगाडीने पाणी विकत आणून आदिवासी आश्रमशाळांना पुरवठा करावा लागत असल्याने आधीच पायाभूत सुविधांची वानवा सोसणार्‍या आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पाण्याच्या मूलभूत समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे दैनंदिन पाण्याचा वापर आदिवासी वसतिगृहात अगदी काटकसरीने केला जात असल्याने याचे परिणाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -