कलिंगड विक्रेत्याचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून

अज्ञात आरोपी फरार

Mumbai
murder

कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणार्‍या विक्रेत्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील बामणे गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या एका शेडमध्ये घडली आहे. बबन गोपाळ सांबरे (४५) असे खून झालेल्या कलिंगड विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील बामणे गावात मृतक बबन हे कुटुंबासह राहत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी ते बामणे फाट्यावर तात्पुरते शेड उभारारून त्यामध्ये कलिंगड (टरबुज) विक्रीचा व्यवसाय करीत होते. नेहमीप्रमाणे दिवसभर कलिंगडची विक्री करून रात्रीच्या सुमाराला कलिंगड चोरीला जावू नये म्हणून ते कलिंगड ठेवलेल्या शेडमध्येच झोपायचे. मात्र शनिवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी शेडमध्ये झोपलेल्या बबन सांबरे यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात येवून अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करीत बबनचा मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. तर मृतक बबनच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूर पोलिसांकडून त्या फरार अज्ञात आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here