घरमुंबईवॅक्सिन वॉर संपुष्टात, सीरम - भारत बायोटेक एकत्र काम करणार

वॅक्सिन वॉर संपुष्टात, सीरम – भारत बायोटेक एकत्र काम करणार

Subscribe

भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातले शाब्दिक युद्ध न थांबण्याचे संकेत मिळत असतानाच आता दोन्ही कंपन्यांकडून संयुक्त प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीरम इंस्टिट्यूटचे अदार पूनावाला आणि भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्ण एल्ला यांनी भारतात आणि जगभरात एकत्रितपणे लसनिर्मिती आणि पुरवठा करण्याचे स्पष्ट केले आहे. आमच्यापुढे सध्या महत्वाचे उदिष्ट हे भारतातील आणि जगभरातील लोकांचे जीव वाचवणे आणि जगभरातील लोकांचे राहणीमान सुधारणे हे आहे. लस ही जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी लोकांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाच्या आहेत. तसेच जगभरातील अर्थव्यवस्था सुधारणे हे उदिष्ट असल्याचे त्यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

पुणेस्थित सीरम इंस्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी स्पष्ट केले की वॅक्सिन ही जगभरात पोहचवण्यात येईल. याआधीच्या अदार पूनावाला यांच्या वक्तव्यामध्ये ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनका कोरोना लसीची देशाबाहेरचे वितरण हे येत्या काही महिन्यांसाठी थांबवण्यात येणार आहे. पण आज संयुक्त पत्रक काढत त्यांनी स्पष्ट केले, लोकांमध्ये सध्या थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे. कोरोनाची लस ही सर्व देशांमध्ये देण्यात येणार आहे.

Covishield vs Covaxin

याआधी सीरम इंस्टिट्यूटचे अदार पूनावाला आणि भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांच्यात शाब्दिक वार छेडले गेले होते. त्यामुळे खूप मोठा वाद सुरू झाला होता. या वादावर पडदा टाकणारे संयुक्त पत्रक हे दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आले. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मंजुरीनंतर सीरम इंस्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांचे एक वक्तव्य समोर आले होते. फक्त ऑक्सफर्ड, मॉडर्ना आणि फायजरची वॅक्सिन ही सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला होता. इतर कंपन्यांच्या लशी या मात्र पाण्यासारख्या आहेत असे विधान त्यांनी केले होते. या विधानावर भारत बायोटेकच्या कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केले की, आम्हाला अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नव्हती. आम्ही आमचे काम हे प्रामाणिकपणे केले आहे. पण आमच्या लसीला कोण पाणी म्हणत असेल तर ही गोष्ट आम्हाला मंजुर नाही. आम्ही वैज्ञानिक आहोत, आम्ही आमचे काम केले आहे. लस निर्मात्या कंपन्यांच्या या वक्तव्यांमुळे मात्र अनेक राज्य सरकारमार्फत प्रतिक्रिया आल्या होत्या.

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -