आपल्या कामाच्या ठिकाणच वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक संस्थेत काही ना काही अभिनव प्रयोग करण्यात येतात. पण एका कंपनीत खुद्द कंपनीओचा सीईओच कर्मचारी वर्गासोबत कामाच्या सुरूवातीला बॉलिवुडच्या गाण्यावर ताल धरताना दिसला आहे. या सीईओच्या कामाचे कौतुक करतानाच सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Rare to see a CEO dance and have fun in an office setting. That’s the way to create a happy culture @DipaliGoenka #welspun. pic.twitter.com/B6LAd2u3tr
— Harsh Goenka (@hvgoenka) February 18, 2020
बॉलिवुडच्या मुकाबला या गाण्यावर चक्क सीईओ आणि सह व्यवस्थापकीय संचालक हे ठेका धरून नाचत असल्याचा व्हिडिओ हा ट्विटरसह अनेक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीईओ हे कामाच्या सुरूवातीलाच डान्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सहभागी झाल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे सीईओंच्या या पुढाकाराला सर्व कर्मचाऱ्यांनीही तितकाच प्रतिसाद दिला आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण करण्यासाठीचा हा एक चांगला प्रयत्न असल्याचे सांगत या व्हिडिओचे अनेक कमेंट्सच्या माध्यमातून कौतुकही झाले आहे. तसेच हा व्हिडिओही अनेकवेळा व्हायरल झाला आहे.
दिपाली गोएनका या वेलस्पनच्या सीईओनेही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत धन्यवाद व्यक्त केले आहेत. आनंद महिंद्रा, गौतम अदाणी यांनाही कामाच्या ठिकाणी कस वातावरण असत असे दिपाली गोएनका यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारले आहे. कामाच्या ठिकाणी असा पायंडा घातल्यामुळे त्यांच्या पुढाकाराचे कौतुक इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींनी केले आहे. दिपाली गोएनका या मानसशास्त्र विषयातील पदवीधारक असून त्यांनी आपले शिक्षण हार्वड येथून पुर्ण केले आहे. दिपाली गोएनका या वेलस्पनमध्ये २००२ पासून आहेत. त्यांच्याकडे वेलस्पन इंडियाची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह व्यवस्थापकीय संचालक अशी संयुक्त जबाबदारी आहे. उत्तम आरोग्य आणि चांगल मानसिक स्वास्थ्य हे यशाचे रहस्य असल्याचे त्यांचे मत आहे.