घरमुंबईनक्की पाहा! पश्चिम रेल्वेचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा संदेश!

नक्की पाहा! पश्चिम रेल्वेचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा संदेश!

Subscribe

धावत्या ट्रेनमधून पडल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

धावत्या रेल्वेमधून पडल्यामुळे, दारात उभं राहिल्यामुळे किंवा रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे दगावलेल्या व्यक्तींची संख्या मुंबईत काही कमी नाही. विशेषत: चालू ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना तोल जाऊन पडल्यामुळे अनेक दुर्घटना मुंबईतल्या लोकल रेल्वे स्थानकांवर घडत असतात. यामध्ये काहींना कायमचं अपंगत्व येतं, तर काहींचे दुर्दैवी मृत्यू देखील होतात. रेल्वे प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे स्वत:चा जीव धोक्यात न घालण्याबद्दल वारंवार आवाहन देखील केलं जातं. मात्र, त्यानंतरही मुंबईकरांमध्ये जनजागृती होत नसल्याचं अपघातांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येतं. त्यामुळेच आता पश्चिम रेल्वेने प्रवाशांना जागरूक करण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. पश्चिम रेल्वेच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशांना अशा प्रकारे जीव धोक्यात न घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘तुम्ही भलेही धावत्या ट्रेनमध्ये चढण्यात वाकबगार असाल. पण वाईट वेळ काही सांगून येत नाही’, असा संदेश या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. तसेच, ‘TicketToSuraksha’ असा हॅशटॅग देखील तयार करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर आल्यानंतर काही नेटिझन्सनी ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम अंमलात आणण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य रेल्वे उकाड्यात पश्चिम रेल्वे मात्र गारेगार

२०१४ पासून ते २०१७ पर्यत पश्चिम-मध्य रेल्वे मार्गवर १२ हजार ९४३ नागरिकांच्या बळी गेला आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवर ८ हजार ४५० तर पश्चिम रेल्वेवर ४,४९३ प्रवाशांना समावेश आहेत.उपनगरीय रेल्वे मार्गांवर प्रामुख्याने रेल्वे रूळ ओलांडणे, चालत्या लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे, दरवाजाला लटकणे आदी कारणांमुळे सर्वाधिक अपघात होतात. मागील दीड वर्षांत म्हणजे १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत मध्य रेल्वेवर एकूण ३०३७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहेत. यामध्ये २६८६ पुरुष तर ४५१ महिलांच्या समावेश आहेत. या वर्षीच्या जानेवारी ते जुलै महिन्या पर्यंत मध्य रेल्वेवर ११०९ प्रवाशांच्या मृत्यू झाला आहेत. दरम्यान, रेल्वेकडून जरी अशा प्रकारचे आवाहन करणारे संदेश दिले जात असले, तरी मुंबईकर प्रवाशांमध्ये यातून कितपत जागृती निर्माण होईल, हा प्रश्नच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -