घरमुंबईवसई स्थानकावरील सिग्नल बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

वसई स्थानकावरील सिग्नल बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

Subscribe

पश्चिम रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशीरा धावत आहेत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या लोकल उशीराने धावत असल्याने प्रवाशांची गौरसोय.

पश्चिम रेल्वेच्या वसई रेल्वे स्थानकावरील सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेवर हा बिघाड झाल्यामुळे फलाटावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. आज सकाळी हा सिग्नल बिघाडझाल्याने लोकल चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी लोकल धीम्या गतीने सुरुअसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे ऑफिसला उशीर होईल म्हणून विरार वसईकर भडकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -