घरमुंबईफक्त पश्चिम रेल्वेवर 'मेगाब्लॉक' मुंबईकरांना दिलासा

फक्त पश्चिम रेल्वेवर ‘मेगाब्लॉक’ मुंबईकरांना दिलासा

Subscribe

आज फक्त पश्चिम रेल्वेवर 'मेगाब्लॉक' असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस उजाडला आहे. मात्र, संप सुरुच असल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. यातच रेल्वेसुद्धा दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असते. त्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी देखील घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे यामुळे हाल होतात. मात्र या आठवड्यात मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्ग, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर ब्लॉक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असून पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

या मार्गावर घेण्यात आला ‘मेगाब्लॉक’

पश्चिम रेल्वेने रविवारी चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेतला आहे. इगतपुरी आणि बदलापूर – कर्जत दरम्यान रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे त्याचा उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नसून उपनगरीय लोकल गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. दरम्यान मुंबईतील संपावर वेळीच तोडगा निघाला नाही तर मात्र मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परंतु बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने याचा अधिक ताण मुंबईची वाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर पडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -