घरमुंबईहार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेची वंगण प्रणाली

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेची वंगण प्रणाली

Subscribe

लोकलचे चाकांचे घर्षण,झीजही होणार नाही

मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वळणांमुळे लोकल गाड्यांच्या चाकांचे घर्षण आणि मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झीजमुळे लोकलचे वेळापत्रक बिघडत होते. त्यामुळे मध्य रेल्वेने यावर उपाय म्हणून लोकलच्या चाकांना ‘चाक वंगण प्रणाली’ (वेगळ्या प्रकारचे ऑईल) लावण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे चाकांची झीज होणार नसून लोकल वेळेत धावेल. परिणामी लोकलचे वेळापत्रक सुधारण्यास मदत मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस.जैन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वळणे आहेत. वळणांमुळे लोकलचे रुळांवर सातत्याने घर्षण होते. अशा ठिकाणी लोकल पुढे सुरळीत जाण्यासाठी वेगमर्यादाही निश्चित केल्या आहे. तरीही या मार्गावरील वळणांमुळे चाकांचे घर्षण होऊन त्यांची झीज होते. अशावेळी चाकांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊन लोकल जागीच थांबणे, रुळांवरुन घसरणे इत्यादीही घटना होतात. आठवड्यातून किमान दोन लोकल गाड्यांमध्ये असे प्रकार हार्बर व ट्रान्स हार्बरवर होतात. सातत्याने घडणार्‍या या घटनांमुळे लोकल देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये नेण्याशिवाय पर्याय नसतो. चाकांमधील दुरुस्तीसाठी एक ते दोन दिवस लागत असल्याने परिणामी लोकल गाड्या आणि त्यांच्या फेर्‍या प्रवाशांच्या सेवेत कमी येतात. या घटनांमुळे वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊने हार्बरवासियांचे हाल होत होते. सध्या मध्य रेल्वेच्या हार्बर व ट्रान्स हार्बवर मार्गावर 52 लोकल गाड्या आहे. त्यांच्या हार्बरवर 614 फेर्‍या, तर ट्रान्स हार्बरवर 262 फेर्‍या होतात. परंतु, चाकांमधील या समस्यांमुळे काही लोकल धावू शकत नव्हत्या. परिणामी फेर्‍या रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचा फटका प्रवाशांना बसून फेर्‍या कमी येत होत्या.

- Advertisement -

चाकांच घर्षण,झीजही होणार नाही यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. चाकांसाठी वंगण प्रणाली मध्य रेल्वेनी आत्मसात केली आहे. यात चाकांना वंगण लागल्यान लोकलच्या चाकाचे घर्षण आणि झीजही होणार नाही. लोकल गाड्यांच्या खालच्या भागांमध्येच ही प्रणाली बसवण्यात येत आहे. मोटरमनने लोकल सुरू करताच सुरुवातीच्या चाकांमधून वंगण निघेल व आपोआप ते अन्य चाकांनाही मिळत जाईल, अशा प्रकारची यंत्रणा लोकल गाड्यांमध्ये बसवली जात आहे. त्यामुळे चाकांचे आयुर्मानही वाढणार असून देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी लागणारा वेळही वाचेल अशी माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस. जैन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -