घरमुंबई'दिशा विधेयक' महाराष्ट्र राज्यात कधी? - मनसे आमदार राजू पाटील

‘दिशा विधेयक’ महाराष्ट्र राज्यात कधी? – मनसे आमदार राजू पाटील

Subscribe

महाराष्ट्रात आंध्र प्रदेश सारखे दिशा विधेयक कधी पारित होणार असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसचे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.

आंध्र प्रदेश विधानसभेचे शुक्रवारी ‘दिशा विधेयक’ पारित केले. बलात्काराच्या गुन्ह्यांची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्कार करणाऱ्यांना फाशी देणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात कधी?, असा प्रश्न त्यांनी ट्विटर द्वारे  @cmomaharashtra टॅग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. महाराष्ट्र राज्याने सुद्धा हे विधेयक आणून सर्वानुमते पारित केले पाहिजे आणि पुढचे पाऊल महाराष्ट्र राज्याने टाकावे, असे पाटील यांनी सांगितले.

काय आहे तरतूद?

सुधारित दिशा विधेयकात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यापासून २१ दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करून मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. विधेयकात भारतीय दंड विधानाच्या ३५४ कलमात दुरुस्ती करण्यात आली असून ३५४ (ई) हे कलम बनवण्यात आले आहे. सुधारणा कायद्यानुसार, अशा प्रकरणात जेथे साक्षीपुरावे उपलब्ध आहेत. तेथे तपास सात दिवसांत पूर्ण करून आणि पुढील १४ दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शिक्षा दिली जावी, असे म्हटले आहे.


हेही वाचा – आंध्र प्रदेशात आता बलात्काऱ्याला २१ दिवसात फाशी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -