घरमुंबईदहावी, बारावीची फेरपरीक्षा कधी?; विद्यार्थी, पालक संभ्रमात

दहावी, बारावीची फेरपरीक्षा कधी?; विद्यार्थी, पालक संभ्रमात

Subscribe

राज्य मंडळाकडून परीक्षेबाबत काहीच सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहावी, बारावीमध्ये अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये तातडीने फेरपरीक्षा घेण्यात येते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशीरा जाहीर झालेल्या निकालानंतर ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. परंतु अद्यापही राज्य मंडळाकडून परीक्षेबाबत काहीच सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहावी, बारावीच्या निकालानंतर अनुतीर्ण विद्यार्थ्यांना तातडीने फेरपरीक्षा देता यावी यासाठी राज्य मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार दहावीच्या फेरपरीक्षेसाठी १३ हजारांहून अधिक तर बारावीच्या परीक्षेसाठी २३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र ऑक्टोबर सुरू झाला तरी परीक्षेबाबत राज्य मंडळाकडून कोणत्याही सूचना किंवा परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले नाही. परीक्षा होणार आहे की स्थगित होणार याबाबत राज्य मंडळाने लवकरात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थीच्या मेहनत फुकट जाऊ नये व विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास वेळ मिळावा यासाठी राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर करावे. अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

परीक्षांबाबत सूचना व निर्णय नसल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक संभ्रमित आहे. फेरपरीक्षा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा.
– राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमॉक्रॅटिक फ्रंट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -