घरमुंबईसिव्हील रुग्णालयात सुविधा कधी देणार?

सिव्हील रुग्णालयात सुविधा कधी देणार?

Subscribe

राष्ट्रवादी महिला आघाडीचा मोर्चा

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी 547 बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यासाठी आवश्यक इमारतीचे अंदाजपत्रक आणि इमारतीचे आराखडे तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत, तसेच पर्यायी जागाही शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असताना याच ठिकाणी असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, या कामामुळे रुग्णांची अधिकच गैरसोय होत आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता.

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा करीना दयालरानी यांच्या समवेत जयश्री कोळेकर, हाजीबेगम शेख, रेखा देवदास, संगीता लोकरे, मल्लीका पिल्लई, मनिषा भोसले, वैशाली साळवी, अश्विनी मोरे, इत्यादी राष्ट्रवादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

- Advertisement -

संबंधित अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारण्यात आला. रुग्णालयात बेडची कमतरता, अस्वच्छता, रुग्णांची औषध उपचार सुविधा, याबाबत सिव्हील शल्य चिकित्सक कैलास पवार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी पवार यांनी याबाबत लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

जिह्यातील अनेक गरीब-गरजुंसाठी हे रुग्णालय आशेचे किरण आहे. मात्र, जीर्ण झालेल्या इमारतींच्या अवस्थेमुळे अनेकवेळा दुर्घटना घडल्या आहेत. याची पुनरावृत्ती होऊ नये. जिह्यातून प्रत्येक भागातून या ठिकाणी उपचारासाठी नागरिक येत आहेत. त्यांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात. याकरिता हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भविष्यात याबाबत कोणत्या उपाययोजना झाल्या नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने दयालरानी यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -