घरमुंबईठाण्यातील बड्या हॉस्पिटलवर कारवाई कधी? भाजपाच्या नगरसेवकाचा सवाल

ठाण्यातील बड्या हॉस्पिटलवर कारवाई कधी? भाजपाच्या नगरसेवकाचा सवाल

Subscribe

रुग्णांची लूट सुरू असल्याचे महापालिकेला किती पुरावे हवेत, असा सवाल पत्राद्वारे पवार यांनी केला आहे.

अवाजवी बिले आकारणाऱ्या मुंब्रा येथील तीन हॉस्पिटल प्रमाणेच ठाण्यात कोरोनाचे उपचार करुन पैसे उकळणाऱ्या बड्या हॉस्पीटलांवर कारवाई केव्हा होणार, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंब्र्यात छोट्या माशांवर कारवाई केली, पण महापालिकेच्या जाळ्यात बडी हॉस्पिटले केव्हा सापडणार? या हॉस्पिटल्स विरोधात किती पुरावे हवेत, असा सवालही नारायण पवार यांनी केला आहे.

मुंब्रा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णालयात जागा नाही, असे सांगून दाखल करून न घेणाऱ्या, गरीब आजारी लोकांना आणि प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांकडून भरमसाठ पैसे उकळणाऱ्या मुंब्रा येथील बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर रुग्णालय व युनिव्हर्सल रुग्णालयावर महापालिकेने कारवाई केली. मात्र, अशाच प्रकारे ठाण्यातील बड्या हॉस्पिटलविरोधात कारवाई झालेली नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

कोरोनावरील रुग्णांसाठी महापालिकेने काही प्रमुख खाजगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली. या रुग्णालयांकडून अवाजवी बिले आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने बैठक घेऊन प्रत्येक कक्षासाठी दरही निश्चित केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून माहिती घेऊन, विविध वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात संबंधित रुग्णालयात सर्व श्रेणीतील नागरिकांवर मोफत उपचार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित रुग्णालयांकडून जादा बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत, असे नारायण पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.


Corornavirus: ठाण्यात रुग्णांची लुट करणाऱ्या खासगी रूग्णालयांना चाप


मुंब्रा येथे छोट्या हॉस्पिटल्सवर कारवाई झाली. मात्र, ठाण्यातील बड्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन मोकळेच आहे. त्यामुळे ही कारवाई म्हणजे बडे मासे सोडून लहान माशांना जाळ्यात अडकविणाऱ्यासारखी वाटू नये, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. घोडबंदर रोड येथील एका हॉस्पिटलमध्ये मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाच्या पत्नीची अडवणूक केली असल्याचा प्रकार घडला. अवाच्या सवा बिल आकारण्याबरोबरच शिल्लक बिलाची रक्कम न दिल्यामुळे पोलिस पत्नीला पायरीवर बसवून ठेवण्यात आले, ही बाब पोलिस दलाबरोबरच ठाणे शहराला अपमानास्पद आहे. अशा पद्धतीने रुग्णांची लूट सुरू असल्याचे महापालिकेला किती पुरावे हवेत, असा सवाल पवार यांनी पत्राद्वारे केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -