घरमुंबईचर्नी रोडचा पूल कधी उभारणार ?पुलाअभावी प्रवाशांची हेळसांड

चर्नी रोडचा पूल कधी उभारणार ?पुलाअभावी प्रवाशांची हेळसांड

Subscribe

गेल्या २९ सप्टेंबरला एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अवघ्या १५ दिवसांत चर्नी रोडच्या पुलाच्या पायऱ्या कोसळून दुर्घटना घडली ज्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले होते.या दुर्घटनेनंतर हा पूल नव्याने बांधला जावा म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे पूर्णपणे पाडण्यात आला पण आतापर्यंत ७ महीने उलटूनही पुलाच्या बांधकामाला म्हणावा तसा वेग आलेला नाही.

चर्नी रोड परिसरात असणारा हा पूल पाडल्यापासून प्रवाशांनी होणाऱ्या मनस्तापाबरोबरच वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. एलफिन्स्टन पुलाच्या घटनेनंतर एलफिन्स्टन पूल लष्कराच्या सहाय्याने अवघ्या तीन महिन्यात उभारण्यात आला. पण चर्नी रोडचा पूल अद्याप उभारला गेलेला नाही त्यामुळे गिरगाव आणि आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

पुलाअभावी वाहतुकीवर परिणाम-

चर्नी रोड पुलालगत या पुलाव्यतिरिक्त अन्य कोणताही पूल नाही त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडून स्टेशनमध्ये प्रवेश करावा लागतो. याचा परीणाम हा रस्त्यावरच्या वाहतुकीवर होत आहे. प्रवासी रस्ता ओलांडताना गाड्यांना थांबवून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे.

- Advertisement -

स्टेशनला ‘स्कायवॉक’ नाहीच-

चर्नी रोड स्टेशनला पूर्वेकडच्या बाजूला एकही स्कायवॉक नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आधार म्हणून असणारा एक पूल पाडल्यानंतर प्रवाशांना स्टेशन परिसरात जाण्यासाठी ठिकठिकाणी रेल्वे स्टेशनचे फाटक तोडण्यात आले आहेत.

“पूल कोसळल्यापासून सर्वच प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रस्ता ओलाडताना कित्येकदा भीतीसुध्दा वाटते. जेष्ठांना तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा पूल लवकरात लवकर उभा केला तर प्रवाशांचे हाल होणार नाहीत”

-राजेश शेंडे, प्रवासी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -