घरमुंबईविनाअनुदानित कॉलेजांतील शिक्षकांना वेतन कधी मिळणार

विनाअनुदानित कॉलेजांतील शिक्षकांना वेतन कधी मिळणार

Subscribe

वेतन नसल्याने घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे वेतन कधी मिळणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक विनाअनुदानित सेल्फ फायनान्स महाविद्यालयांनी शिक्षकांचे वेतन रखडवले आहे. सात ते आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने आता दिवस कसे काढायचे असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. वेतन नसल्याने घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे वेतन कधी मिळणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक विनाअनुदानित सेल्फ फायनान्स महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशासनाकडून वेतन देण्यात आले नाही. तर ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने काहींना अतिरिक्त झाल्याचे सांगत कामावरून काढून टाकण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून वेतन नसल्याने बचत केलेल्या पैशांवर घरखर्च चालवला, पण अद्यापही महाविद्यालयांकडून वेतन देण्यात येत नसल्याने दिवस कसे काढायचे असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. वेतन न मिळाल्यास जगणे मुश्किल होईल, असे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. वेतन नसल्याने नुकतीच झालेली दिवाळीही अंधारात साजरी करावी लागल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात आली. शिक्षकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे विनाअनुदानित सेल्फ फायनान्स महाविद्यालयांना शिक्षकांचे प्रलंबित वेतन तातडीने देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिक्षकांच्या ‘मुक्ता’ संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना केली आहे.

- Advertisement -

शिक्षकांना वर्क फ्रॉम होम द्यावे

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही रुग्ण संख्या वाढत आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना प्रत्यक्षात बोलावले जात आहे. महाविद्यालयात येऊनही शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे लागत आहे. मुंबईतील परिस्थिती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन पाहता मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती मुक्ता संघटनेकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -